Video : खाकीवर उगारला हात! महिलेने वाहतूक पोलिसाची पकडली कॉलर अन् केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 01:21 PM2020-10-24T13:21:17+5:302020-10-24T13:22:03+5:30
Assualting to Traffic Police : याप्रकरणी एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मुंबई : काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कालची घटना आहे.
कॉटन एक्सचेंज नाका येथे ट्रॅफिक हवालदार आपले कर्तव्य बजावत असताना या सादविका या महिलेसोबत एक इसम होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करुन वाहतूक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना मारहाण केली. त्यांची नेमणूक काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन येथे करण्यात आली होती. याप्रकरणी एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली. सादविका आणि खान यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जाण्यात आले आहे.
या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत महिला वाहतूक पोलिसाने महिलेला अब्रू उत्पन्न करणारी शिवी घातली असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रस्त्यावर लोकांना जमवून वाहतूक पोलिसांच्या श्रीमुखात लगावली.
Mumbai: Two persons, including a woman who was seen thrashing a police personnel on duty & misbehaving with him on Kalbadevi Road in a viral video, have been arrested.
— ANI (@ANI) October 24, 2020
The woman has alleged that the police personnel had abused her.
(Image - screengrab from viral video) pic.twitter.com/ENWGxBqxiA
काय आणि कसं घडलं हे प्रकरण ?
दि. २३/१०/२०२० रोजी दुपारी १५ १५ . दरम्यान काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार एकनाथ पार्टे हे कॉटन एक्सचेंज चौक, सुरती हंटिलसमोर, काळबादेवी या ठिकाणी दैनंदिन कर्तव्य बजावित होते. त्यादरम्यान एक मोटार सायकलस्वार विना हेल्मेट मोटार सायकल चालवून वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांन विना हेल्मेटची कारवाई करण्यासाठी थांबविले. त्यावेळी पुरुष मोटार सायकलस्वार व महिला यांनी पोलिसांशी हुज्जत घालावयास सुरुवात केली. पार्टे यांनी त्यांना सर" व "मॅडम" असे संबोधून कोणतीही शिवीगाळ व अपशब्द उच्चारलेला नसताना देखील पोलिसाने अपशब्द व शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप महिला करु लागली. नंतर महिला त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण करु लागली. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस हवालदार पार्टे यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की व मारहाण करीत असताना देखील पार्टे यांनी स्वत:चा संयम ढळू न देता कोणतीही अर्वाच्च भाषा न वापरता आरोपी महिलेला मॅडम" असे संबोधल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करीता महिला पोलीस अमलदारांना बोलावून घेतले. ही घटना पडत असताना पोलीस पार्टे यांनी आरोपी महिलेविरुध्द कोणतेही गैरवर्तन झालेले दिसून येत नाही.