'त्या' नगरसेवकाला अटक करा म्हणत पोलीस ठाण्यात हनुमान चालीसा पठण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 07:47 PM2020-07-14T19:47:45+5:302020-07-14T19:52:57+5:30

सीओ तृतीय अनिल समानिया यांनी सांगितले की, २० जणांची नावे आणि शंभर अज्ञात लोकांविरूद्ध कलम 188 आणि साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hanuman Chalisa recited at police station for not arresting corporator | 'त्या' नगरसेवकाला अटक करा म्हणत पोलीस ठाण्यात हनुमान चालीसा पठण, गुन्हा दाखल

'त्या' नगरसेवकाला अटक करा म्हणत पोलीस ठाण्यात हनुमान चालीसा पठण, गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे२० जणांची नावे आणि शंभर अज्ञात लोकांविरूद्ध कलम 188 आणि साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उज्जैन महाकाल मंदिरातून कानपूरच्या विकास दुबे याला अटक झाल्यानंतर बसपाचे नगरसेवक सद्दाम हुसेन यांनी महाकाल मंदिरात दहशतवादाचा तळ असल्याचे म्हटले होते.

अलिगड - विकास दुबेला अटक करण्यात आलेल्या मंदिर दहशतवादाचं तळ  अशी टीका बसपाच्या नगरसेवकाने केली. मात्र, तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई करून त्या नगरसेवकाला अटक न केल्याने संतप्त संघटनांनी पोलीस ठाण्यात सामूहिक हनुमान चालीसा पठण केले. उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यात बसपाचे नगरसेवक सद्दाम हुसेन यांना अटक करण्यात यावी म्हणून संघटनांकडून मंगळवारी क्वार्सी पोलीस ठाण्यात हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. मात्र, पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सीओ तृतीय अनिल समानिया यांनी सांगितले की, २० जणांची नावे आणि शंभर अज्ञात लोकांविरूद्ध कलम 188 आणि साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उज्जैन महाकाल मंदिरातून कानपूरच्या विकास दुबे याला अटक झाल्यानंतर बसपाचे नगरसेवक सद्दाम हुसेन यांनी महाकाल मंदिरात दहशतवादाचा तळ असल्याचे
म्हटले होते. चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली. सद्दाम हुसेनविरोधात क्वार्सी पोलिस स्टेशनमध्ये भाजयुमो जिलाध्यक्ष मुकेश लोधी यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु अटक करण्यात आली नव्हती. बजरंग दलाचे महानगर संयोजक गौरव शर्मा म्हणाले की सद्दामप्रती पोलिस-प्रशासनाची उदासीन वृत्ती आंदोलन करण्यास भाग पाडते. मंगळवारी सकाळी क्वार्सी पोलिस स्टेशनमध्ये सामुहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. प्रशासनाच्या या कृतीत हिंदू समाज आता घाबरत नाही. हिंदू जागरण मंच, जन क्रांती मंच, आहुती संस्था, अखिल भारतीय हिंदू महासभा, हिंदू विद्यार्थी वाहिनी, राष्ट्रीय वीरंगना दल इत्यादी संस्थांनी बजरंग दलासमवेत या आंदोलनात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. शहरातील सर्व मंदिरातील पुजारीही एकत्र आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

 

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

 

वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य 

 

दुष्काळात तेरावा महिना! मेडिकलमध्ये औषध घ्यायला गेलेल्या आजोबांच्या पेन्शनच्या पैशावर चोरट्यांनी मारला डल्ला 

 

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Web Title: Hanuman Chalisa recited at police station for not arresting corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.