मुलींची छेड अन् अश्लील व्हिडिओ पाहण्याचा नाद; तरुणाची वडिलांनीच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 01:07 PM2024-02-02T13:07:44+5:302024-02-02T13:16:01+5:30

विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

Harassment of girls and watching pornographic videos The youth was killed by his father | मुलींची छेड अन् अश्लील व्हिडिओ पाहण्याचा नाद; तरुणाची वडिलांनीच केली हत्या

मुलींची छेड अन् अश्लील व्हिडिओ पाहण्याचा नाद; तरुणाची वडिलांनीच केली हत्या

Solapur Murder ( Marathi News ) : मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या आणि शाळेत मुलींची छेड काढणाऱ्या तरुणाची त्याच्या वडिलांनीच हत्या केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. विजय बट्टू असं मुलाला विष पाजून हत्या करणाऱ्या आरोपी पित्याचं नाव आहे. मागील महिन्यात झालेली ही घटना आता उघड झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार १३ जानेवारी रोजी पोलिसांकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर काही वेळाने सदर तरुणाचा मृतदेह आढळून आला. विशाल बट्टू असं मृत तरुणाचं नाव आहे. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र विशालच्या वडिलांनीच त्याला विष पाजल्याचं आता उघड झालं आहे.

विशाल हा मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहात असत. तसंच तो शाळेतील विद्यार्थिनींचीही छेड काढत होता. त्यामुळे वैतागून त्याचे वडील विजय बट्टू यांनीच थम्सअपमध्ये विष टाकून त्याची हत्या केली. मात्र हा प्रकार उघड होऊ नये, यासाठी आरोपी विजय याने आपला मुलगा गायब असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. मात्र पोलिसांना संशय आल्याने विजयला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली.

दरम्यान, पोलीस चौकशीत विजय बट्टू याने केलेला बनाव फार काळ टिकू शकला नाही आणि अखेर मीच माझ्या मुलाची हत्या केल्याची कबुली विजय याने दिली. त्यानंतर पोलिसांकडून आता त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Harassment of girls and watching pornographic videos The youth was killed by his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.