टेम्पो अन् जमिनीच्या वाटणीवरून विवाहितेचा छळ; बीएसएफमधील जवानासह पाच जणांविरुद्ध गुन्हा
By काशिनाथ वाघमारे | Published: June 17, 2023 03:58 PM2023-06-17T15:58:24+5:302023-06-17T15:58:38+5:30
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादीचे लग्न हे ९ एप्रिल २०१७ रोजी बीएसएफमध्ये नोकरीस असलेल्या योगेश हंबीरराव पाटील यांच्याशी झाला होता.
सोलापूर : टेम्पो घेण्यासाठी वडिलांकडून २० लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ व मारहाण करत वडिलांकडून वाटणीचा हिस्साही वाटून घे म्हणून छळ केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांत सासू, सासरे, पती, ननंद व नंदवा या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयूरी योगेश पाटील (रा.कुर्डू सध्या सापटणे ता.माढा) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादीचे लग्न हे ९ एप्रिल २०१७ रोजी बीएसएफमध्ये नोकरीस असलेल्या योगेश हंबीरराव पाटील यांच्याशी झाला होता. फिर्यादीला लग्नझाल्यानंतर तीन महिने व्यवस्थित संभाळले. त्यानंतर पती योगेश पाटील हे सुट्टीवर गावी आल्यानंतर टेम्पो घ्यायचा आहे, त्यासाठी वडिलांकडून २० लाख रुपये घेऊन ये असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने हकीकत वडिलांना सांगितली. त्यावेळी वडिलांनी पैसे नसल्या कारणाने नकार दिला. त्यानंतर पतीने फिर्यादी पत्नीस मारहाण करुन ड्यूटीवरती निघून गेला. त्यानंतर तिथूनच वाटणीचा जमिनीचा हिस्सा वाटून घेण्यास सांगितले. त्यानंतर सुट्टीवर परत आल्यानंतर फिर्यादीच्या आईवडिलांना माझ्या पत्नीच्या वाटणीची जमीन देत नसाल तर मी ड्युटीवरती जाणार नाही म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली. दरम्यान सासू ,सासरा, ननंद, नंदवा यांनी फिर्यादीच्या पतीला फुगवून तिला मारहाण करत उपाशी ठेवले. त्यानंतर माहेरी सोडले. त्यानंतर सासू सासऱ्यांनी दोन महिन्यानंतर पुन्हा नांदण्यास सासरी आणले. त्यानंतरही जमिनीच्या हिस्स्यावरुन सर्वजण तिला बोलू लागले. सासरे हंबीरराव रामराव पाटील, सासू रतन पाटील,पती योगेश पाटील (सर्व रा.कुर्डू ता.माढा), नणंद योगिता मिसाळ, नंदवा सचिन मिसाळ (रा.पिंपळनेर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.