ऑक्सिजन प्लांटसाठी १० लाख रुपये आण म्हणत पत्नीचा छळ!

By रूपेश हेळवे | Published: July 20, 2023 05:24 PM2023-07-20T17:24:05+5:302023-07-20T17:24:32+5:30

याबाबत फिर्याद नयना विक्रम कामूर्ती ( वय २१, रा. एमआयडीसी, अक्कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Harassment of wife by asking to bring 10 lakh rupees for oxygen plant, Solapur | ऑक्सिजन प्लांटसाठी १० लाख रुपये आण म्हणत पत्नीचा छळ!

ऑक्सिजन प्लांटसाठी १० लाख रुपये आण म्हणत पत्नीचा छळ!

googlenewsNext

सोलापूर : आम्हाला ऑक्सिजन प्लांट टाकायचा आहे, त्याकरीता माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत त्यांना घरातून हाकलून दिल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत फिर्याद नयना विक्रम कामूर्ती ( वय २१, रा. एमआयडीसी, अक्कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पती विक्रम कामुर्ती, सासरे श्रीनिवास कामुर्ती, सासू नागूबाई कामुर्ती, नणंद प्रीती कामुर्ती, दीर मेघनाथ कामुर्ती, सागर कामूर्ती (सर्व रा. गोली टॉवर, गणेश अपार्टमेंट, अशोक चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी नयना यांचे विक्रम कामूर्ती यांच्याशी २०२२ मध्ये विवाह झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तुझ्या आई-वडिलांनी आम्हाला मनाप्रमाणे हुंडा दिला नाही. लग्नात मानपान केला नाही, म्हणत त्रास देत होते. शिवाय तसेच विवाहिता या गरोदर असताना त्यांना घरातील सर्व कामे करण्यास सांगून उपाशी पोटी ठेवले. अशा आशयाची फिर्याद नयना यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वरील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.

Web Title: Harassment of wife by asking to bring 10 lakh rupees for oxygen plant, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.