भाडेकरूकडून महिलेचा विनयभंग, आरोपींविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:27 PM2021-02-22T12:27:45+5:302021-02-22T12:30:54+5:30
crime news : तुम्ही माझ्या आजीस शिवीगाळ का करता, असे म्हणून फिर्यादी महिलेने जाब विचारला. तू घरामध्ये ये, असे म्हणून आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला घरात बोलावले.
पिंपरी : भाडे मागितल्याने शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता भाडेकरूंनी घरात बोलावून महिलेचा विनयभंग केला. थेरगाव येथे १५ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. (Harassment of a woman by a tenant)
याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३५ वर्षीय महिला व १९ वर्षीय तरुणासह तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या आजीने भाडेकरू असलेल्या आरोपी महिलेकडे भाडे मागितले. त्यावरून आरोपी महिलेने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तुम्ही माझ्या आजीस शिवीगाळ का करता, असे म्हणून फिर्यादी महिलेने जाब विचारला. तू घरामध्ये ये, असे म्हणून आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला घरात बोलावले. तेरेको ब्रिज के निचे फेक दुंगी, अशी धमकी आरोपी महिलेने दिली. आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण केली. तसेच आरोपी तरुणाने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला.