हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 07:23 PM2020-09-10T19:23:07+5:302020-09-10T19:23:54+5:30

या उद्योगपतीने मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. 

Harbhajan Singh duped by Chennai businessman of Rs 4 crore | हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

Next
ठळक मुद्दे गेली अनेक वर्ष या उद्योगपतीने हरभजनकडून घेतलेले पैसे परत करत नसल्यामुळे अखेरीस हरभजनने पोलिसांत धाव घेतली आहे.

चेन्नई - भारतीय संघाचा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करणारा हरभजन सिंह याला ४ कोटींचा गंडा घातला आहे. काही दिवसांपूर्वी खासगी कारण देत हरभजनने आयपीएलमधून माघार घेतली होती. यानंतर चेन्नईमधील एका उद्योगपतीने हरभजनची ४ कोटींची फसवणूक केली आहे. गेली अनेक वर्ष या उद्योगपतीने हरभजनकडून घेतलेले पैसे परत करत नसल्यामुळे अखेरीस हरभजनने पोलिसांत धाव घेतली आहे. या उद्योगपतीने मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. 


२०१५ साली आपल्या एका मित्राच्या ओळखीने हरभजनशी चेन्नईतील जुहू बीच येथे राहणाऱ्या जी. महेश या उद्योगपतीशी भेटला होता. यावेळी महेशच्या उद्योगासाठी हरभजनने ४ कोटी रुपये कर्ज स्वरुपात दिले होते. यानंतर हरभजन आपले पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार महेश याच्या संपर्कात होता, परंतू प्रत्येक वेळी हरभजनला त्याने टाळले. गेल्या महिन्यात महेशने हरभजनला २५ लाखांचा चेक दिला. जो चेक खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे बाऊन्स झाला. ज्यामुळे हरभजनने अखेरीस महेशविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान हरभजनने आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर महेशने मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. महेशने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हरभजनकडून घेतलेल्या ४ कोटींच्या कर्जाच्या मोबदल्यात आपण थलंबूर येथील एका जागेची कागदपत्र तारण म्हणून हरभजनला दिली असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. महेश याने सर्व थकबाकी हरभजनला दिली असल्याचं त्याने म्हटलं आहे. सध्या चेन्नई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?

 

आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय  

 

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली 

 

Web Title: Harbhajan Singh duped by Chennai businessman of Rs 4 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.