वेल्डर बनला बनावट अधिकारी! इंस्टाग्रामवर मुलीशी मैत्री, हॉटेलमध्ये बलात्कार, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:24 PM2023-01-01T18:24:41+5:302023-01-01T18:35:52+5:30

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट आरटीओ अधिकारी बनवून अल्पवयीन मुलीला फसवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

harda young man sexuall assault with minor girl after befriending on instagram in harda of madhya pradesh told himself rto | वेल्डर बनला बनावट अधिकारी! इंस्टाग्रामवर मुलीशी मैत्री, हॉटेलमध्ये बलात्कार, असा झाला खुलासा

वेल्डर बनला बनावट अधिकारी! इंस्टाग्रामवर मुलीशी मैत्री, हॉटेलमध्ये बलात्कार, असा झाला खुलासा

googlenewsNext

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट आरटीओ अधिकारी बनवून अल्पवयीन मुलीला फसवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. या तरुणाने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरात राहणार्‍या पीडित तरुणीशी अगोदर इंस्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर हरदा येथून तिला फूस लावून बलात्काराची घटना समोर आली आहे. 

पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. नंतर हरदा येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सिव्हिल लाइन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय बाकुडे हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्याने बनावट आरटीओ अधिकारी म्हणून खाते सुरू केले. यावरुन त्याने हरदा येथील एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. एक दिवस अक्षयने पीडितेवर बलात्कार केला.

मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या नातेवाईकांनी 23 डिसेंबर रोजी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडितेच्या मोबाईलच्या कॉल डिटेलमध्ये एक नंबर मिळाला. यावर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली.

आरोपी आईच्या नावाने सिम वापरत असे. अक्षयची इन्स्टाग्रामवर एका मुलीशी मैत्री करण्याची गोष्ट एखाद्या चित्रपटासारखी आहे. आरोपीने आपल्या मोबाईलच्या डीपीवर आरटीओच्या वाहनासह फोटो ठेवला होता. हा फोटो दाखवून त्याने पीडितेला आरटीओ अधिकारी असल्याचे पटवून दिले. तर अक्षय वेल्डिंगचे काम करतो. 

...अन्यथा मी मरेन म्हणत कॉलेजमधून तरुणीचे अपहरण; त्यानंतर बळजबरीने ‘कोर्ट मॅरेज’, अमरावतीमधील घटना

अर्पी लोकेशन बदलून पोलिसांना चकमा देत होता. पोलिसांनी महाराष्ट्रात पोहोचून तपास केला असता तो आईच्या नावाने असलेले सिमकार्ड वापरत असल्याचे समोर आले. नंबर लोकेशनच्या आधारे पोलिसांनी अकोट गाठले. मात्र आरोपी वारंवार लोकेशन बदलून पोलिसांना चकमा देत होता. चार वेळा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करत मोठ्या गॅरेजमध्ये पोहोचून त्याला अटक केली.

Web Title: harda young man sexuall assault with minor girl after befriending on instagram in harda of madhya pradesh told himself rto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.