धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा; तीन नव्या कायद्यांवरील चर्चेत गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:38 AM2023-12-21T05:38:05+5:302023-12-21T05:38:39+5:30

गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांऐवजी तीन नव्या कायद्यांची जागा घेणारे विधेयक सादर करताना ते बोलत होते.

Harsh punishment for hit and run; Home Minister Amit Shah's information in the discussion on three new laws | धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा; तीन नव्या कायद्यांवरील चर्चेत गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा; तीन नव्या कायद्यांवरील चर्चेत गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हिट अँड रन प्रकरणात आता ज्याने धडक दिली, त्या वाहनचालकाने अपघातग्रस्ताला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यास, त्याच्या शिक्षेत कपात करण्यात येणार आहे. पण धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा देण्यात येईल, असे लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. 
गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांऐवजी तीन नव्या कायद्यांची जागा घेणारे विधेयक सादर करताना ते बोलत होते.

नव्या विधेयकांमधील महत्त्वाचे मुद्दे...

nसंघटित गुन्हेगारीची व्याख्या : संघटित गुन्हेगारीमध्ये सायबर गुन्हे, लोकांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांचा समावेश केल्याने पोलिस आणि न्यायव्यवस्थेला तपास करण्यास सोपे जाणार आहे.
nनवीन कलमे : नव्याने आणण्यात आलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ४८४ ऐवजी ५३३ कलमे आहेत. नऊ कलमे वाढविण्यात आली, तर १७७ कलमांमध्ये बदल करण्यात आला. ३९ उपकलमांचा समावेश केला असून ४४ नव्या तरतुदी आहेत.
nबलात्कार प्रकरण : यापुढे बलात्कार प्रकरणात न्यायवैद्यक शाळेच्या अहवालाला प्रमुख स्थान असणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास केला जाईल.
nपीडितांना म्हणणे मांडण्याचा अधिकार : भारतीय न्यायसंहितेने सुनावणीदरम्यान पीडितांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला आहे. तसेच शून्य एफआयआर पीडिताची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मागे घेता येणार नाही.
nजामीन मिळणार : सुनावणी सुरू असतानाच आरोपीने जर एक तृतीयांश काळ तुरुंगात काढला असेल तर तो किंवा ती जामीन मिळण्यास पात्र ठरणार.
nराजद्रोहाचा कायदा रद्द : ब्रिटिशकाळात आणला गेलेला राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात डांबण्यासाठी हे कलम ब्रिटिशांनी वापरले होते. त्याऐवजी आता देशद्रोहाचे कलम समाविष्ट केले आहे.
 

Web Title: Harsh punishment for hit and run; Home Minister Amit Shah's information in the discussion on three new laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.