Video - मंत्र्याच्या पुतण्याची दादागिरी! हॉटेलमध्ये तोडफोड, दारूच्या नशेत कर्मचाऱ्यांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:07 PM2023-07-20T16:07:57+5:302023-07-20T16:08:58+5:30

हॉटेल मालक अभिमन्यू सिंहचे वडील भवानी सिंग यांच्या तक्रारीवरून वैशाली नगर पोलीस ठाण्यात बुधवारी हर्षदीप खाचरियावास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Harshdeep Singh khachariyawas nephew of minister pratap singh vandalized hotel and assaulted employees | Video - मंत्र्याच्या पुतण्याची दादागिरी! हॉटेलमध्ये तोडफोड, दारूच्या नशेत कर्मचाऱ्यांना मारहाण

फोटो - अमर उजाला

googlenewsNext

मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांचा पुतण्या हर्षदीप सिंह खाचरियावास याने जयपूरमधील हॉटेलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हर्षदीपने कर्मचाऱ्यांसह हॉटेलच्या गेस्टला देखील मारहाण केली. ही घटना जयपूरमधील वैशाली नगरची आहे. हॉटेल मालक अभिमन्यू सिंहचे वडील भवानी सिंग यांच्या तक्रारीवरून वैशाली नगर पोलीस ठाण्यात बुधवारी हर्षदीप खाचरियावास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल मालक अभिमन्यूने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास हर्षदीप सिंह खाचरियावास त्याच्या काही मित्रांसह हॉटेलमध्ये आला होता. याच दरम्यान हॉटेलमध्ये आलेल्या गेस्टसोबत हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांची बाचाबाची झाली. काही वेळाने गेस्ट त्यांच्या खोलीत गेले असता हर्षदीपने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा रूम नंबर विचारला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी नंबर देण्यास नकार दिल्याने हर्षदीपने तोडफोड करण्यास सुरुवात केली. याबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

तोडफोडीच्या वेळी गोंधळ वाढल्यावर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील इतर गेस्ट लॉबीमध्ये आले. याच दरम्यान हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांनी गेस्ट आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांसमोरच मारहाण केली. पोलिसांनी गेस्ट आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी दारूच्या नशेत असलेल्या हर्षदीप आणि त्याच्या मित्रांचा गोंधळ सुरूच होती. पोलीस गेस्टला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ लागले तेव्हा त्यांनी बाहेर येऊन त्याला बेदम मारहाण केली.

हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलच्या सर्व्हर रूममध्ये घुसून सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या मुलाला मारहाण करण्यात आली. हॉटेल मालक अभिमन्यू सिंह सांगतात की, घटनेच्या वेळी हर्षदीपने मोबाईल नंबर घेऊन फोन केला होता. यावेळी त्याने आपण करण सिंह खाचरियावास यांचा मुलगा असल्याचे सांगितले. मी त्यांना बोलावू का? यावर अभिमन्यू म्हणाला की, हॉटेल फक्त तुमचेच आहे, मात्र तोडफोड करून मारामारी करणे योग्य नाही. यानंतर तो आपल्या साथीदारांसह हॉटेलमधून बाहेर पडला. 

हॉटेल मालक अभिमन्यूचे वडील भवानी सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, घटनेपासून हर्षदीप त्यांना आणि त्याचा मुलगा अभिमन्यूला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. फोन उचलणं बंद केल्यावर त्यांनी इतर नंबरवरून फोन केले आणि मुख्यमंत्र्यांनाही फोन न उचलण्याची हिंमत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Harshdeep Singh khachariyawas nephew of minister pratap singh vandalized hotel and assaulted employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.