हार्वर्ड रिटर्न, एआय तज्ज्ञ टॉप-100 यादीत; मुलाची हत्या करणारी सीईओ सुचना सेठ स्वतःची कंपनी चालवत होती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 04:35 PM2024-01-09T16:35:15+5:302024-01-09T16:38:09+5:30
सुचना सेठ हिने २०२० मध्ये द माइंडफुल एआय लॅबची स्थापना केली, ही कंपनी AI आधारित स्टार्टअप आहे. कृत्रिम भाषा, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि टेक्स्ट मॅचिंग या क्षेत्रातील ४ यूएस पेटंट्सही त्यांच्याकडे आहेत.
आज सकाळी गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या महिला सीईओने सुचना सेठ या महिलेने स्वत:च्या ४ वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. एवढेच नाही तर ही महिला गोव्याहून कर्नाटकात मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात होती, यावेळी पोलिसांनी तिला अटक केली आहे.
आठवड्यातून एक दिवस मुलाला भेटायची होती परवानगी; आईला तेही पहावले नाही, मुलाचाच केला खून
सुचना सेठ हिने माइंडफुल एआय लॅबची संस्थापक आहे, ही कंपनी तिने २०२० मध्ये सुरू केली होती. सुचना सेठची माइंडफुल एआय लॅब डेटा सायन्स टीम आणि स्टार्टअपना सल्ला देण्याचे काम करते. यासह, ते मशीन लर्निंग सोल्यूशन्स प्रदान करते. सुचनाला या क्षेत्रातील १२ वर्षांचा अनुभव आहे आणि आपल्या मुलाची हत्या करणाऱ्या या महिलेचा २०२० मध्ये एआय एथिक्समधील टॉप-100 प्रतिभावान महिलांमध्ये समावेश होता.
सुचना सेठ हिने हार्वर्ड विद्यापीठाच्या बर्कमन क्लेन सेंटरमध्ये फेलोशिप केली आहे. बर्कमन आणि डेटा अँड सोसायटी येथे व्यवसायात नैतिक मशीन लर्निंग आणि एआय कार्यान्वित करण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. यानंतर, २०२० मध्ये, तिने 'द माइंडफुल एआय' लॅबची सुरुवात केली, जी AI आधारित स्टार्टअप आहे. सुचना सेठ यांच्याकडे आर्टिफिशियल लँग्वेज, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि टेक्स्ट मेलिंग या क्षेत्रात ४ अमेरिकन पेटंट्स आहेत.
हत्येचा असा झाला खुलासा
मुलाची हत्या करून बँगमध्ये मुलाचा मृतदेह घालून बंगळूर येथे जात असताना चित्रदुर्ग जिल्ह्यात आयमंगला पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी तिला अटक केली. गोवा पोलिसांनी तशी खबर दिल्यामुळे आययमंगल पोलीसांनी ही कारवाई केली. सूचना ही मूळ बंगाल येथील असून तिच्या पतीचे घर बंगळूरला आहे.
गोव्याची एका रिसॉर्ट मध्ये सूचना आपल्या मुलासह आली होती. अचानक ती बंगळूरला जायला निघाली आणि जाताना तिच्याबरोबर मुलगा नव्हता. एक मोठी शुटकेश घेऊन ती निघाली होती. विमानाने प्रवास करण्या ऐवजी तिने टँक्सी बोलावल्यामुळे रिसॉर्टच्या करमचाऱयांना शंका आली. ती राहायला होती त्या खोलीत र क्ताचे डाग दिसल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलीसांना माहिती दिली. येथून तपासाचा चक्रे फिरली आणि ती पकडली गेली. मुलाचा खून करून मृतदेह सुटकेशमध्ये घालून ती चालली होती.