मोठी बातमी! खाण माफियाला रोखण्यासाठी गेले DSP; आरोपींनी डंपरखाली चिरडून घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 02:17 PM2022-07-19T14:17:23+5:302022-07-19T14:27:46+5:30

हरियाणातील नूह जिल्ह्यात खाण माफियाने DSP पदावरील पोलीस अधिकाऱ्याला डंपरखाली चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे.

haryana crime news; DSP goes to catch mining mafia; accused crushed DSP under the dumper | मोठी बातमी! खाण माफियाला रोखण्यासाठी गेले DSP; आरोपींनी डंपरखाली चिरडून घेतला जीव

मोठी बातमी! खाण माफियाला रोखण्यासाठी गेले DSP; आरोपींनी डंपरखाली चिरडून घेतला जीव

Next

नूह: हरियाणाच्या नूह जिल्ह्यात खाण माफियाने एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याला डंपरखाली चिरडून मारल्याची घटना घडली आहे. डीएसपी सुरेंद्र सिंह विश्नोई अवैध खाणकाम थांबवण्यासाठी गेले होते. त्यांनी अवैधरित्या खडकांनी भरलेला ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, पण डंपर चालकाने त्यांच्यावर डंबर चढवला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपींना पकडण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.

ही घटना गुरुग्रामला लागून असलेल्या नूह जिल्ह्यातील तवाडू पोलीस स्टेशन हद्दीतील पाचगाव गावातील आहे. डीएसपी(तावडू) सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना गावाशेजारील अरवली टेकडीवर बेकायदेशीर खाण सुरू असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ते मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या टीमसह पोहोचले. 

नुपुर शर्माची पोस्ट का पाहतोस..? असे म्हणत तरुणाला चाकुने भोसकले, प्रकृती नाजुक

पोलीस पथकाला पाहताच डंबर चालक व खाणकामातील इतर लोक डंपर घेऊन पळू लागले. डीएसपी गाडी थांबवण्यासाठी पुढे आले असता डंपर चालकाने त्यांच्यांवर डंबर चढवला. भरलेल्या डंबरच्या टायरखाली आल्याने डीएसपींचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एसपी नूह वरुण सिंगला घटनास्थळी पोहोचले असून, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

या घटनेनंतर खाण माफिया घटनास्थळावरुन पळून गेले. घटनेची माहिती मिळताच एसपी नूह, एसडीएम आणि तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून गाव आणि अरवली डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तावडू उपविभागातील अरवली भागातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात खाण माफिया अवैध उत्खनन करत आहेत. 
 

Web Title: haryana crime news; DSP goes to catch mining mafia; accused crushed DSP under the dumper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.