बोंबला! लग्नानंतर नवरीला घरी घेऊन जात होता नवरदेव, रस्त्यात तिचा चेहरा पाहिला अन् बसला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:36 PM2022-02-17T16:36:08+5:302022-02-17T16:38:04+5:30
Fake Marriage News : ही घटना हरयाणातील आहे. हरयाणाच्या नांगल चौधरी येथील फूलचंद गुर्जरने फेब्रुवारीला यासंबंधी तक्रार पोलिसात दिली होती. त्यात सांगितलं होतं की, ४ लोकांनी त्याचं खोटं लग्न लावून दिलं.
Fake Marriage News : पूर्व राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यात लग्नाच्या नावावर एका तरूणाची फसवणूक करण्यात आली आहे. इथे खोटं लग्न लावून देणाऱ्या गॅंगने एका तरूणाकडून ७ लाख रूपये घेऊन दुसऱ्याच तरूणीसोबत त्याचं लग्न लावून दिलं. लग्न झाल्यावर घरी जाताना नवरदेवाला संशय आल्याने याचा भांडाफोड झाला. त्याला संशय आला आणि त्याने नवरीच्या डोक्यावरील पदर उचलून पाहिला तर त्याला धक्काच बसला.
लग्न झाल्यावर सत्य आलं समोर
नवरीचा चेहरा पाहिल्यावर त्याने लग्न लावून देणाऱ्या लोकांना संपर्क केला. ते घटनास्थळी आले आणि नवरदेवाने दिलेल्या ७ लाखांपैकी अर्धे रूपये त्याला परत दिले आणि नवरीला तेथून सोबत घेऊन गेले. त्यानंतर नवरदेवाने पोलिसांकडे धाव घेतली. नंतर पोलिसांनी चौकशी केली आणि खोट्या नवरीसह चार लोकांना अटक केली.
ही घटना हरयाणातील आहे. हरयाणाच्या नांगल चौधरी येथील फूलचंद गुर्जरने फेब्रुवारीला यासंबंधी तक्रार पोलिसात दिली होती. त्यात सांगितलं होतं की, ४ लोकांनी त्याचं खोटं लग्न लावून दिलं आणि ७ लाख रूपये घेऊन फसवणूक केली. त्याने सांगितलं की, रवि धोबी नावाच्या एका व्यक्तीने एका तरूणीसोबत त्याचं लग्न जुळवलं होतं. त्या बदल्यात त्याने ७ लाख रूपये घेतले होते.
नवरीचा चेहरा पाहिला अन्....
फूलचंदचा आरोप आहे की, आरोपींनी तरूणाचं लग्न तर लावून दिलं. पण नवरी बदलली. आधी जी मुलगी दाखवली गेली होती तिच्यासोबत लग्न लावून दिलं नाही. दुसऱ्याच मुलीसोबत त्याचं लग्न लावलं. जेव्हा ते लग्न करून परत होते तेव्हा रस्त्यात नवरदेवाला नवरीवर संशय आला. त्यामुळे त्याने नवरीच्या डोक्यावरील पदर उचलून पाहिला आणि त्याला धक्का बसला. कारण ती आधी पाहिली ती मुलगी नव्हती. दुसरीच मुलगी होती. आरोपींनी ज्या मुलीसोबत लग्न लावून दिलं तिची नाव नेहा आहे. ती दिल्लीच्या पंजाबी बाग भागातील आहे.
काही पैसे परत देऊन, नवरीला घेऊन गेले
पोलिसांनी सांगितलं की, यावर फूलचंद आणि नवरदेवाने लग्न लावणाऱ्या दलालांना फोन केला. त्यानंतर ते लोक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पक्षात तिथे वाद झाला. त्यानंतर लग्न लावून देणाऱ्या लोकांनी फूलचंद आणि नवरदेवावर काही पैसे फेकले. त्यानंतर नवरीला आपल्या सोबत परत घेऊन गेले. तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव नवरदेवाला झाली. अशात ते पोलिसांकडे गेले.
नवरीसहीत चौघांना अटक
तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली आणि चार आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून १४ फेब्रुवारीला अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली जात आहे. ही गॅंग अनेकांचं खोटं लावून देत त्यांची फसवणूक करीत होती. त्यांना अनेकांकडून लाखो रूपये लुटले आहेत.