बापरे! १६ गर्लफ्रेंड्सची हौस पूर्ण करण्यासाठी BMW, मर्सिडीजसह ५० कारची चोरी, अशी झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 02:53 PM2020-10-15T14:53:32+5:302020-10-15T14:57:19+5:30

Crime News : आरोपी रॉबिनने पोलिसांचीही अनेकदा दिशाभूल केली आहे. त्याने प्रत्येकवेळी कार चोरीच्या घटना बदलल्या आहेत.

haryana faridabad a youth stolen 50 cars like bmw mercedes to fulfill 16 girlfriends wishes | बापरे! १६ गर्लफ्रेंड्सची हौस पूर्ण करण्यासाठी BMW, मर्सिडीजसह ५० कारची चोरी, अशी झाली अटक

बापरे! १६ गर्लफ्रेंड्सची हौस पूर्ण करण्यासाठी BMW, मर्सिडीजसह ५० कारची चोरी, अशी झाली अटक

Next
ठळक मुद्देआरोपी फक्त लक्झरी कारची चोरी करत होता.

फरीदाबाद : हरयाणा पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे, ज्याच्या १६ गर्लफ्रेंड्स आहेत. या आरोपीने आपल्या गर्लफ्रेंड्सची हौस पूर्ण करण्यासाठी महागड्या गाड्यांची चोरी केली आहे. देशातील विविध राज्यातून ५० हून अधिक महागड्या गाड्यांची चोरी करणारा हा हिसारमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. फरीदाबादमधील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लक्झरी कारची चोरी करण्याऱ्या या चोरट्याला हिसारमधील जवाहरनगरमध्ये रॉबिन, ​​राहुल, ​​हेमंत आणि ​​जॉनी या नावाने ओळखले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रॉबिनने पोलिसांचीही अनेकदा दिशाभूल केली आहे. त्याने प्रत्येकवेळी कार चोरीच्या घटना बदलल्या आहेत. पकडल्यावर तो आपला पत्ता सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचा सांगत होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने हिसारमध्ये अनेक महागड्या कारची चोरी केली आहे. हिसारमध्ये त्याने पोलिसांजवळपास आपल्या १५ ते २० वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते लिहिलेले आहेत.

१६ गर्लफ्रेंड असल्याचा पोलिसांचा दावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबिन आता हिसारमध्ये राहत नाही. तर तो बाहेरील राज्यांमध्ये राहतो. आरोपी फक्त लक्झरी कारची चोरी करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हिसार वगळता एनसीआरसह देशातील इतर राज्यांमधून लक्झरी कारची चोरी केली आहे. आरोपीच्या १६ गर्लफ्रेंड असून त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी महागड्या कारची चोरी करत होता, असा पोलिसांचा दावा केला आहे.

याआधीही अटक करण्यात आली होती
आरोपीला एक वर्षापूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो अलिकडेच तुरूंगातून बाहेर आला आणि पुन्हा कार चोरी करण्यास सुरवात केली. ३१ ऑगस्ट रोजी त्याने सेक्टर -२८ फरीदाबादमध्ये घराबाहेर पार्क केलेल्या फॉर्च्युनर कारची चोरी केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरण छडा लावला.  आरोपीने गाझियाबाद, जोधपूर येथील फॉर्च्युनर आणि गुरुग्राममधून जीप चोरल्याची कबुलीही दिली आहे. यासंदर्भात गुन्हे शाखेने तेथील पोलिसांना कळविले आहे.
 

Web Title: haryana faridabad a youth stolen 50 cars like bmw mercedes to fulfill 16 girlfriends wishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.