गर्लफ्रेन्डला दिले होते ७० लाख रूपये, मागितले तर दिली खोट्या रेप केसची धमकी; तरूणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:10 PM2022-01-27T16:10:01+5:302022-01-27T16:10:51+5:30
Haryana : हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील बादलगढचा राहणारा २८ वर्षीय विक्रम नावाच्या तरूणाची फतेहाबाद येथे राहणाऱ्या शेफाली नावाच्या तरूणीसोबत ओळख झाली होती.
हरयाणाच्या (Haryana) फतेहाबादच्या तरूणाने गर्लफ्रेन्डवर सावत्र वडिलांची बेसुमार संपत्ती उडवली. जेव्हा त्याने तिला दिलेले पैसे परत मागितले तेव्हा तिने त्याला खोट्या रेप केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. यानंतर तरूणाने विष खाऊन आत्महत्या केली. पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली आहे. पोलिसांनी गर्लफ्रेन्डसहीत २ आरोपींवर गुन्हा दाखल केला.
तरूणीसोबत मैत्री, मग प्रेम
मीडिया रिपोर्टनुसार, हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील बादलगढचा राहणारा २८ वर्षीय विक्रम नावाच्या तरूणाची फतेहाबाद येथे राहणाऱ्या शेफाली नावाच्या तरूणीसोबत ओळख झाली होती. काही दिवसात ही ओळख प्रेमात बदलली. मृत विक्रमची आई रंजुबालाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, फतेहाबादची शेफाली रतियातील एका बॅंकेत काम करते.
तसेच तिने विक्रमला फसवून ७० लाख रूपये रोख आणि १० तोळं सोनं घेतलं होतं. यादरम्यान विक्रमचे सावत्र वडील ओमप्रकाशला विक्रम आणि शेफाली यांच्यातील गडबड करून झालेली देवाण घेवाण समजली. ओमप्रकाशने विक्रम आणि शेफालीवर फसवणूक करून पैसे हडपल्याची तक्रार दाखल केली.
पैसे मागितले तर दिली रेप केसची धमकी
शेफालीने विक्रमला पैसे परत मागितल्यावर खोट्या रेप केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. विक्रमने शेफालीसोबतच ४० लाख ३० हजार रूपये रूडकीच्या रूप नावाच्या एका व्यक्तीला दिले होते. पण आपले सावत्र वडील ओमप्रकाश यांना विक्रम पैसे परत देऊ शकत नव्हता. त्याला कुणीच पैसे परत देत नव्हतं.
अडकल्याचं समजत केली आत्महत्या
चारही बाजूने स्वत:ला फसलेलं पाहून विक्रमने २५ जानेवारीला अनाजमंडीमध्ये आपल्या सावत्र वडिलांच्या दुकानात विष पिऊन आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तो वाचू शकला नाही. त्याच्या खिशातून एक सुसाइड नोटही सापडली. पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेत विक्रमच्या आईच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केली.
पोलीस अधिकारी रूपेश चौधरी यांनी सांगितलं की, मृत विक्रमच्या बाबतीच पोलिसांना हॉस्पिटमध्ये माहिती मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. विक्रमच्या आईच्या तक्रारीवरून शेफाली आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल केला. सुसाइड नोटमध्ये त्याने शेफालीला पैसे दिल्याचं लिहिलं होतं. तसेच शेफालीने खोट्या रेप केसमध्ये अडकवू अशी धमकी दिल्याचंही लिहिलं होतं.
हे पण वाचा :
पाकिस्तानातील 'ते' ५ किल्ले जे फाळणीआधी आपल्या भारताची शान होते!