लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 10:33 AM2024-11-17T10:33:02+5:302024-11-17T10:34:50+5:30

नववधू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी फरार झाली आहे.

haryana looteri dulhan ran away in sonipat the next day after marriage took valuables with her | लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब

फोटो - INDIA TV

देशातील विविध राज्यांमधून धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील खरखोडा गावातून अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे नववधू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी फरार झाली आहे. रात्री सासू आणि नवऱ्याला तिने चहातून नशा आणणारा पदार्थ दिला. यानंतर दोघांची प्रकृती खालावली. दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलें.

याच संधीचा फायदा घेऊन घरातील सर्व सामानावर नवरीने डल्ला मारला आणि पळून गेली. घरातील सर्व सामान विखुरलेलं आढळून आलं आणि मौल्यवान वस्तूही गायब असल्याचं दिसलं. कुटुंबीयांनी खरखोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपतच्या खरखोडा गुरुकुल वाली गली येथे राहणाऱ्या मनजीतचं लग्न १३ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे राहणाऱ्या पल्लवीशी झालं होतं. पल्लवीच्या कुटुंबीयांनाही लग्नासाठी १.२५ लाख रुपये देण्यात आले होते. लग्न आटोपून मनजीत १४ नोव्हेंबरला खरखोडा येथे पोहोचला.

लग्नाचे रिसेप्शन २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते, परंतु १५ नोव्हेंबरच्या रात्री नवविवाहित वधूने मनजीत आणि त्याची आई शकुंतला यांच्या चहात नशा आणणारा पदार्थ टाकला आणि सामान घेऊन पळ काढला. यानंतर पहाटे चार वाजता दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत खरखोडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

तब्येत बरी झाल्यावर नवरा आणि सासू घरी पोहोचले असता घरातील सर्व साहित्य विस्कटलेलं आढळून आलं आणि काही मौल्यवान वस्तूही गायब असल्याचं समजलं. वधू आणि तिच्या वडिलांचा फोनही बंद आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 
 

Web Title: haryana looteri dulhan ran away in sonipat the next day after marriage took valuables with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.