भयंकर! दंगलखोरांनी महिला जजची गाडी जाळली; 3 वर्षांच्या मुलीसह बसस्थानकात लपून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:17 AM2023-08-03T10:17:58+5:302023-08-03T10:22:12+5:30

न्यायाधीश आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

haryana nuh violence rioters attacked firing stone pelting judge daughter | भयंकर! दंगलखोरांनी महिला जजची गाडी जाळली; 3 वर्षांच्या मुलीसह बसस्थानकात लपून वाचवला जीव

फोटो - आजतक

googlenewsNext

हरियाणातील नूंह येथे एडिशनल चीफ ज्यूडिशियल मजिस्ट्रेट (ACJM) यांच्या वाहनावर हल्ला करून ते पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, न्यायाधीश आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. एफआयआरमधून ही भयंकर बाब समोर आली आहे. मंगळवारी नूंह शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये असे सांगण्यात आले की, सोमवारी ACJM अंजली जैन यांच्या वाहनावर हल्लेखोरांनी दगडफेक आणि गोळीबार केला. 

अंजली यांना ज्यामुळे आपल्या चिमुकल्या मुलीसह जीव वाचवून पळून जावे लागले. जज, त्यांची मुलगी आणि कर्मचारी यांना नूह येथील जुन्या बसस्थानकावरील कार्यशाळेत आश्रय घ्यावा लागला, ज्यांची नंतर काही वकिलांनी तेथून सुटका केली. एफआयआरनुसार, अंजली, त्यांची तीन वर्षांची मुलगी आणि गनमॅन सियाराम सोमवारी दुपारी 1 वाजता त्यांच्या फॉक्सवॅगन कारमधून औषधे घेण्यासाठी नल्हार येथील एसकेएम मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते. 

दुपारी दोनच्या सुमारास त्या मेडिकल कॉलेजमधून परतत असताना दिल्ली-अलवर मार्गावरील जुन्या बसस्थानकाजवळ सुमारे 100-150 दंगलखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. दंगलखोर त्यांच्यावर दगडफेक करत होते. "काही दगड कारच्या मागील काचेवर आदळल्यानंतर दंगलखोरांनी परिसरात गोळीबार केला. आम्ही गाडी रस्त्यावर सोडून जीव वाचवण्यासाठी पळत सुटलो. आम्ही जुन्या बसस्थानकातील एका वर्कशॉपमध्ये लपलो आणि नंतर काही वकिलांनी त्यांची सुटका केली. दुसऱ्या दिवशी मी गाडी पाहायला गेलो तेव्हा दंगलखोरांनी ती जाळल्याचे समजले" असं म्हटलं आहे. 

नूंह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे 31 जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची परवानगीही प्रशासनाकडून घेण्यात आली होती. सोमवारी ब्रिज मंडळाच्या यात्रेदरम्यान त्यावर दगडफेक करण्यात आली. काही वेळातच दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला. शेकडो गाड्या जाळल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. गोळीबारही झाला. याशिवाय एका मंदिरात शेकडो लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. पोलिसांवरही हल्ले झाले. नुहानंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Web Title: haryana nuh violence rioters attacked firing stone pelting judge daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.