लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:04 PM2021-07-19T14:04:27+5:302021-07-19T14:06:32+5:30
तक्रारीत लग्नाआधी कार आणि बाइक घेणे व एका दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करण्याचा आरोपही तरूणीने लावला आहे. दुसऱ्या तरूणीसोबत तरूणाचं १८ जुलैला लग्न होणार होतं.
हरयाणाच्या (Haryana) रेवाडी जिल्ह्यात लग्नाच्या एक दिवसाआधी नवरदेव रेपमध्ये (Rape Case) पकडलं गेला. त्याच्या विरोधात एक तरूणीने रेपचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने तरूणावर साखरपुड्यानंतर हॉटेलमध्ये बोलवून रेप केल्याचा आरोप लावत महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
तक्रारीत लग्नाआधी कार आणि बाइक घेणे व एका दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करण्याचा आरोपही तरूणीने लावला आहे. दुसऱ्या तरूणीसोबत तरूणाचं १८ जुलैला लग्न होणार होतं. महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पीडित तरूणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील बावल रोडवरील एका हॉटेलमध्ये १५ एप्रिल २०१९ ला तरूणीचा साखरपुडा एका तरूणासोबत झाला होता. साखरपुड्यावेळी सांगण्यात आलं होतं की, तरूण एका खाजगी बॅंकेत कार्यरत आहे. पण नंतर समजलं होतं की, तो त्या बॅंकेत नोकरी करत नाही. १० नोव्हेंबर २०१९ ला तरूणाने तरूणीला लग्नाचं प्लॅनिंग करण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये बोलवलं होतं. आरोपीने लग्न करण्याचा विश्वास देऊन तिच्यासोबत हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते.
कार घेण्यासाठी दोन लाखही दिले
तरूणीने आरोप लावला की, तरूणाला एक बाइकही घेऊन दिली होती. ७ डिसेंबर २०२० ला तरूणाने बलेनो कार खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून दोन लाख रूपयेही घेतले होते. पण जेव्हाही तरूणी लग्नाचा विषय काढत होती तेव्हा तेव्हा तरूण टाळाटाळ करत होता. आता तिला समजलं की, तरूण १८ जुलैला दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करणार आहे.
दुसऱ्या तरूणीसोबत लग्न
पीडितेने सांगितलं की, तिला १६ जुलैला समजलं होतं की, तरूण १८ जुलैला शहरातीलच एका दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार आहे. तिने तरूणासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला होता. पण तो तिच्यासोबत बोलला नाही. पीडितेने शुक्रवारी महिला पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दिली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.