Hathras Gangrape : हाथरस प्रकरणात 'नवा खुलासा', एक आरोपी निघाला अल्पवयीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 03:13 PM2020-10-20T15:13:20+5:302020-10-20T15:20:52+5:30
Hathras Gangrape : सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आता समोर आली आहे.
हाथरस - उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू आहे. तपासासोबतच आता कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तपासादरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा हाथरस प्रकरणात 'नवा खुलासा' करण्यात आला आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आता समोर आली आहे. सीबीआयच्या टीमने आरोपींची जवळपास 8 तास चौकशी केली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चार आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती दिली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या हाती संबंधित आरोपीची एक मार्कशीट देखील लागली आहे. या मार्कशीटनुसार, आरोपीची जन्मतारीख दोन डिसेंबर 2002 असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कुटुंबीयांकडून ही मार्कशीट सीबीआयच्या टीमकडे सोपवण्यात आली आहे. हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर तपासाचा वेग वाढला आहे. सीबीआयच्या वेगवेगळ्या टीम्सनं अनेक लोकांकडे घटनेबद्दल चौकशी करत आहेत.
नात्याला काळीमा! मुलगी जिवंत आहे की तिचा मृत्यू झालाय हे कसं चेक करू?, बलात्कारानंतर गुगलवर केलं सर्चhttps://t.co/nPPwbPxj7z#Rape#crimenews#crime
— Lokmat (@MiLOKMAT) October 9, 2020
दोन स्थानिक पत्रकारांचीकडेही केली चौकशी
सीबीआयच्या एका टीमने चंदपा पोलीस स्टेशनलाही भेट दिली. याच पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा प्रकरणाची एफआयआर दाखल करण्यात आली होती. तसेच सीबीआयच्या टीमने या पोलीस स्टेशनचे तीन निलंबित पोलीस कर्मचारी सागाबाद सीओ राम शब्द, एसएचओ दिनेश कुमार वर्मा आणि मोहर्रिर महेश पाल यांची काही तास चौकशी केली. यासोबतच टीमने दोन स्थानिक पत्रकारांचीकडेही प्रकरणाची चौकशी केली. 14 सप्टेंबर रोजी पीडितेची आई आणि भाऊ तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले असताना हे दोन पत्रकारही त्यांच्यासोबत होते.
Hathras Gangrape : पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात https://t.co/duQ6LvXiFf#Hathras#HathrasHorror#HathrasHorrorShocksIndia#UttarPradesh#uttarpradeshpolice
— Lokmat (@MiLOKMAT) October 8, 2020
हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला पोलीस स्टेशनमधून जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरकडेही सीबीआयने चौकशी केली. यापूर्वी सीबीआयच्या तीन सदस्यीय टीमने अलीगडच्या जवाहर लाल नेहरू मेडिकल कॉलेजचा दौरा केला. पीडित मुलीला दिल्लीला हलवण्यापूर्वी तिच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती याआधी समोर आली होती.
हाथरस प्रकरणात 'नवा ट्विस्ट', आरोपीने पीडितेच्या भावाचा नंबर 'या' नावाने केला होता सेव्ह
चंदपा परिसरातील गावात सामूहिक बलात्कार प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप याने आपल्या मोबाईलमध्ये पीडितेच्या भावाचा फोन नंबर हा "सॅनिटायझर" या नावाने सेव्ह केल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून त्याचीच अनेकदा चर्चा असते. मात्र आता आरोपीने पीडितेच्या भावाचा मोबाईल नंबर सॅनिटायझर या नावाने सेव्ह करून ठेवल्याने याची अधिक चौकशी सुरू आहे.
Balrampur Horror : "उत्तर प्रदेशच्या जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार आणि सरकारची दडपशाही सुरू"https://t.co/9WjzVTqAGF#Congress#RahulGandhi#BalrampurHorror#BJP#YogiGovernment#yogiadithyanath@congpic.twitter.com/ZcMtqoMOXH
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2020