Hathras Gangrape : वेगळंच वळण! हाथरस प्रकरणात समोर आलं नक्षल कनेक्शन, बनावट वहिनी बनून रचला जात होता कट 

By पूनम अपराज | Published: October 10, 2020 02:58 PM2020-10-10T14:58:37+5:302020-10-10T15:01:05+5:30

Hathras Gangrape : याआधी शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित फंडिंग प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि भीमा आर्मीचे धागेदोरे सापडले आहेत.

Hathras Gangrape : Naxal connection revealed in Hathras case, fake Bhabhi appeared | Hathras Gangrape : वेगळंच वळण! हाथरस प्रकरणात समोर आलं नक्षल कनेक्शन, बनावट वहिनी बनून रचला जात होता कट 

Hathras Gangrape : वेगळंच वळण! हाथरस प्रकरणात समोर आलं नक्षल कनेक्शन, बनावट वहिनी बनून रचला जात होता कट 

Next
ठळक मुद्देहाथरस घटनेची चौकशी करत एसआयटीच्या सूत्रांनी उघड केले की, नक्षलवादी महिलेने डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकला होता आणि ती पोलिस आणि एसआयटीशी बोलत होती. बहराइच पोलिसांचे म्हणणे आहे की, हा परिसर भारत-नेपाळ सीमेला लागूनच आहे आणि पीएफआयशी संबंधित इतर काही लोकांना अलिकडच्या काळात अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. दरम्यान, शनिवारी हाथरस घटनेत नक्षल कनेक्शन समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एसआयटीची टीम मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील एका महिलेचा शोध घेत आहे. असे सांगितले जात आहे की, संशयित नक्षलवादी महिला पीडितेच्या घरात वहिनी म्हणून राहत होती. एसआयटीच्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, नक्षलवादी महिला पीडित मुलीच्या घरात 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या काळात कट रचत होती. याआधी शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित फंडिंग प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि भीमा आर्मीचे धागेदोरे सापडले आहेत.

हाथरस घटनेची चौकशी करत एसआयटीच्या सूत्रांनी उघड केले की, नक्षलवादी महिलेने डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकला होता आणि ती पोलिस आणि एसआयटीशी बोलत होती. त्याचवेळी घटनेच्या २ दिवसानंतर संशयित महिला पीडित मुलीच्या गावी पोहोचली होती. पीडित मुलीच्या घरात राहून ती कुटुंबातील सदस्यांना भडकावत असल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेची वहिनी बनलेल्या नक्षलवादी कार्यकर्त्याच्या कॉल डिटेलमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, यूपी पोलिस आणि एसआयटीची टीम परकीय फंडिंगसंदर्भात नक्षलवादी कनेक्शनवर तपास काम करत आहे. एसआयटीच्या तपासणीत यापूर्वी पहिले जातीय दंगलीचे षडयंत्र उघड झाले होते. पोलीस त्या महिलेचा आणि तिच्या जवळच्या मित्रांचा शोध घेत आहेत. तरीही एसआयटी टीमने ४ डझन लोकांची चौकशी केली आहे. हाथरस प्रकरणात पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून ते पीएफआयचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.
 

नेपाळ सीमेवर पीएफआय उपक्रम

अटक केलेल्या सदस्यांपैकी एक बहराइचमधील जरवलचा रहिवासी आहे. यानंतर, यूपी पोलिस सक्रिय झाले आहेत. बहराइच पोलिसांचे म्हणणे आहे की, हा परिसर भारत-नेपाळ सीमेला लागूनच आहे आणि पीएफआयशी संबंधित इतर काही लोकांना अलिकडच्या काळात अटक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश व देशात जातीय दंगली पसरवण्यासाठी भारत-नेपाळ सीमेवर पीएफआयच्या कोणत्या हालचाली सुरु आहेत हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Hathras Gangrape : Naxal connection revealed in Hathras case, fake Bhabhi appeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.