Hathras Gangrape : पीडितेवर पोलिसांनी जबरदस्तीने केले मध्यरात्री अंत्यसंस्कार, महिला आयोगाने मागितले स्पष्टीकरण
By पूनम अपराज | Published: September 30, 2020 05:28 PM2020-09-30T17:28:12+5:302020-09-30T17:34:13+5:30
Hathras Gangrape : या प्रकरणात, राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने उत्तर प्रदेश पोलिसांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे, त्याला आता उत्तर देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे काल रात्री सामूहिक बलात्कार पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आला. असा आरोप केला जात आहे की, पोलिसांनी बळजबरीने आणि कुटुंबियांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. या प्रकरणात, राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने उत्तर प्रदेशपोलिसांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे, त्याला आता उत्तर देण्यात आले आहे.
महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी बुधवारी ट्वीट केले की, उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या घटनेत मध्यरात्री अडीच वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. असे का? महिला आयोग याचा निषेध करतो. या ट्विटनंतर थोड्याच वेळात रेखा शर्मा यांनी पुन्हा ट्विट केले की, हाथरस घटनेतील पीडितेच्या भावाने आम्हाला आमच्या कार्यालयात फोन करून माहिती दिली की, त्याला व वडिलांना अंत्यसंस्कार ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु पीडितेचा चेहरा पाहण्याची परवानगी नव्हती.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, सीआयडी किंवा एसआयटी चौकशीत पोलिसांच्या बेजबाबदारपणाची देखील चौकशी केली जावी, यासाठी आवाहन मानवाधिकार आयोगात वकिलाने अपील दाखल केले आहे. हे उल्लेखनीय आहे की, यापूर्वी कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांचे म्हणणे ऐकले नाही आणि घरात कुटुंबियांना बंद करुन जबरदस्तीने अंतिम संस्कार केले, असे विधान केले होते. मात्र, हाथरसचे पोलिस आणि प्रशासनाने वारंवार याला नकार दिला.
दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली असून मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण घटनेवर पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने घरातील सर्व कामांमध्ये मदत करून चौथी - पाचवीपर्यंत शिक्षण घेतले होते. ती आमची सर्वात प्रेमळ मुलगी होती, पण शेवटी तिचा चेहरा पाहण्याची परवानगी नव्हती. बुधवारी स्थानिक खासदारही या कुटुंबास भेटण्यास आले, तेथे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.
In UP Gang-Rape Tragedy, 2.30 am Cremation By Cops, Family was Kept Out. @NCWIndia condemn it strongly. Why the family wasn't allowed in Crematiom? Why at night?@Uppolice@hathraspolicehttps://t.co/OnFySrCYgn
— Rekha Sharma (@sharmarekha) September 30, 2020
The brother of the victim called and told my office that he and father of the victim was taken to the Cremation ground while the Cremation was on but were not allowed to see the face. https://t.co/ZfgKJYI21W
— Rekha Sharma (@sharmarekha) September 30, 2020