Hathras Gangrape : आम्हाला आमचा शेवट दिसतोय! गाव सोडायचंय, पीडितेचे वडील म्हणे मिळतायेत धमक्या 

By पूनम अपराज | Published: October 7, 2020 06:54 PM2020-10-07T18:54:37+5:302020-10-07T18:55:34+5:30

Hathras Gangrape : गावातील कोणीही त्यांना मदत करत नाही. आरोपीच्या कुटूंबाच्यावतीने दबाव आणला जात आहे.

Hathras Gangrape: We see our end! The victim's father says he wants to leave the village | Hathras Gangrape : आम्हाला आमचा शेवट दिसतोय! गाव सोडायचंय, पीडितेचे वडील म्हणे मिळतायेत धमक्या 

Hathras Gangrape : आम्हाला आमचा शेवट दिसतोय! गाव सोडायचंय, पीडितेचे वडील म्हणे मिळतायेत धमक्या 

Next
ठळक मुद्देपीडितेच्या धाकट्या भावाने सांगितले की, कोणी भक्ती आहे किंवा कसे आहे हे आम्हाला विचारण्यास कोणीही आले नाही. आमच्याकडे कोणी चहा विचारण्यास आलं नाही.

हाथरस प्रकरणात एकीकडे दंगलीचे षडयंत्र उघडकीस आलेले आहे, दुसरीकडे ताजी परिस्थिती पाहता पीडितेचे कुटुंब गाव सोडण्याविषयी बोलत आहे. कुटुंबाने आज तकला सांगितले की, ते घाबरून दडपणाखाली जगत आहेत आणि कोणीही त्यांना गावात मदत करत नाही.

आज तकशी बोलताना पीडितेचे वडील व भाऊ म्हणाले की, त्यांना भीतीपोटी जगत आहेत. गावातील कोणीही त्यांना मदत करत नाही. आरोपीच्या कुटूंबाच्यावतीने दबाव आणला जात आहे.

कुणीही मदत केली नाही - कुटुंब

आमच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर कुणीही पाण्याची विचारणा केली नाही असेही या कुटुंबीयांनी सांगितले. आम्हाला मदत करण्याऐवजी लोक आपल्यापासून अंतर ठेवत आहेत. म्हणून आमच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही आहे, आम्ही एका नातेवाईकाच्या ठिकाणी जाऊ.

वडील म्हणाले- आम्ही मृत्यू पाहत आहोत
पीडितेचे वडील म्हणाले, “आम्ही आमचा मृत्यू समोर दिसत आहे. आम्ही विचार करत आहोत की, आपण कुठेतरी नातेवाईकांकडे गेले पाहिजे. घाबरुन बरेच लोक विचारण्यास येत नाहीत, की तुम्ही कसे आहात? कुठेही जाऊ, भीक मागून खाऊ. ''

जीवे मारण्याची धमकी - पीडितेचा भाऊ
पीडितेच्या मोठ्या भावाने सांगितले की, परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, येथे राहणे कठीण झाले आहे. धाकट्या भावाला ठार मारण्याची धमकीही दिली जात आहे. पीडितेच्या धाकट्या भावाने सांगितले की, कोणी भक्ती आहे किंवा कसे आहे हे आम्हाला विचारण्यास कोणीही आले नाही. आमच्याकडे कोणी चहा विचारण्यास आलं नाही.

Hathras Gangrape : पीडितेच्या घराबाहेर मेटल डिटेक्टर, पहा कशी आहे सुरक्षेची व्यवस्था

विशेष म्हणजे, १४ सप्टेंबर रोजी हाथरसात १९ वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली होती. मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यानंतर दीर्घ उपचारानंतर मुलीचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात २९ सप्टेंबरला मृत्यू झाला. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मध्यरात्रीच्या अंधारात मुलीवर परस्पर अंत्यसंस्कार केले असा आरोप केला जात आहे.

Web Title: Hathras Gangrape: We see our end! The victim's father says he wants to leave the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.