Hathras Gangrape : 'त्या' महिलेवर बलात्कार केला नव्हता, खळबळजनक दावा करणाऱ्या 2 डॉक्टरांना हटवले
By पूनम अपराज | Published: October 21, 2020 03:37 PM2020-10-21T15:37:46+5:302020-10-21T15:39:04+5:30
Hathras Gangrape : एका डॉक्टरने महिलेवर बलात्कार केला असल्याच्या पोलिसांच्या म्हणण्याला विरोध केला होता तर दुसऱ्या डॉक्टरने त्या महिलेबद्दल काही अहवालांवर सही केली होती.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे बलात्कार झालेल्या १९ वर्षीय महिलेच्या प्रकरणाशी संबंधित अलिगड मुस्लिम विद्यापीठातील जेएन मेडिकल कॉलेजमधील दोन डॉक्टरांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. एका डॉक्टरने महिलेवरबलात्कार केला असल्याच्या पोलिसांच्या म्हणण्याला विरोध केला होता तर दुसऱ्या डॉक्टरने त्या महिलेबद्दल काही अहवालांवर सही केली होती. सीबीआयने रुग्णालयाला भेट देऊन कर्मचारी आणि डॉक्टरांची चौकशी केली. त्यानंतर एक दिवसानंतर त्यांना काढून टाकण्यात आले. डॉ. मोहम्मद अजीमुद्दीन मलिक आणि डॉ. ओबाद इम्तियाज्युल हक अशी या दोन डॉक्टरांची नावे आहेत.
विद्यापीठ अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, अनेक डॉक्टर आजारी पडल्याने डॉक्टरांना तात्पुरते सेवा बजवण्यासाठी ठेवले गेले होते आणि त्यामुळे त्यांची नोकरीवरून काढून टाकणं ही गरजेची बाब होती. तथापि, पोलिसांपैकी एकाच्या दाव्याच्या विरोधाभासामुळे कदाचित त्याला काढून टाकले असावे असा दावा एका डॉक्टरांनी केला आहे. मलिक म्हणाले होते की, महिलेवर बलात्कार झाला नाही असा निष्कर्ष काढण्यासाठी वैद्यकीय चाचण्या खूप उशिरा घेण्यात आल्या. त्याने १४ सप्टेंबर गुन्हा आणि मेडिकल टेस्ट २२ सप्टेंबरला केल्या यातील कालावधीच्या फरकावर त्या डॉक्टरने प्रश्न उपस्थित केला. फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेने २५ सप्टेंबर रोजी हे नमुने घेतले होते.
फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्याकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये शुक्राणूंचे काहीच आढळले नाही, म्हणून उत्तर प्रदेश प्रशासनाने सातत्याने बलात्कार झाला नसल्याबाबत खंडन केले आहे. "बलात्काराचा ठोस शोध लावण्यासाठी घटनेच्या चार दिवसांत एखाद्या व्यक्तीची चाचणी घेण्याची गरज आहे आणि ११ दिवसानंतर घेण्यात आलेल्या चाचणीचा काहीच उपयोग झाला नाही," असे डॉ. मलिक म्हणाले. “हे मी असे म्हटले होते आणि हाथरस पीडित मुलीच्या बाबतीत त्याचा उल्लेख केला नाही.”
आपल्याला हकालपट्टी करण्यात आल्याचा धक्का बसल्याचे डॉ. हक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “जेएनएमसीमधील बरेच डॉक्टर आजारी होते आणि कोविड -१९ दरम्यान अडीच महिने मी काम केले, परंतु मला कळले की, माझ्या सेवेची आवश्यकता नव्हती.” "मी हाथरस पिडीतेबाबत मीडियासोबत संवाद साधला नव्हता, परंतु पीडिताशी संबंधित काही वैद्यकीय कागदपत्रांवर मी सही केली होती."
ऑगस्टमध्ये मलिक यांना तात्पुरते मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केले होते, जेव्हा रुग्णालयात ११ सीएमओपैकी सहा जणांना कोरोना व्हायरस असल्याचे निदान झाले होते. त्यांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येणार होती, परंतु त्यांना १६ ऑक्टोबरला नोटीस मिळाली होती की ,१० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत तात्पुरते सीएमओ म्हणून त्यांची मुदतवाढ मंजूर होऊ शकली नाही.