Hathras : हाथरस हादरलं! आधी केला मुलीचा विनयभंग; जामीन मिळाल्यावर तिच्या वडिलांना घातल्या गोळ्या

By पूनम अपराज | Published: March 2, 2021 01:41 PM2021-03-02T13:41:47+5:302021-03-02T13:42:50+5:30

Hathras Molestation and then shot dead victim's Father : जामिनावर सुटलेला आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Hathras shuddered! Previously molested a girl; firing at her father after he was granted bail | Hathras : हाथरस हादरलं! आधी केला मुलीचा विनयभंग; जामीन मिळाल्यावर तिच्या वडिलांना घातल्या गोळ्या

Hathras : हाथरस हादरलं! आधी केला मुलीचा विनयभंग; जामीन मिळाल्यावर तिच्या वडिलांना घातल्या गोळ्या

Next
ठळक मुद्दे महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर गौरव शर्माला स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यानंतर तो बाहेर होता.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. २०१८ मध्ये हाथरस Hathras येथे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या आरोपीला जामीन मिळाला. त्यानंतर जामिनावर सुटलेला आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हाथरस पोलिसांनी सांगितले की, आरोपी गौरव शर्माला 2018 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावातील एका मंदिराबाहेर आरोपी व पीडितेच्या कुटूंबात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर गौरवने गोळीबार केला. पीडितेच्या वडिलांचा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.



महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर गौरव शर्माला स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यानंतर तो बाहेर होता. हाथरसचे पोलीस प्रमुख विनीत जयस्वाल यांनी ट्विटरवर दिलेल्या व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, 'मृताने जुलै २०१८ मध्ये आरोपीविरोधात लैंगिक शोषणासाठी गुन्हा दाखल केला होता. आरोपी तुरूंगात गेला आणि महिनाभरानंतर जामिनावर सुटला. दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाले असून चांगले संबंध नव्हते. आरोपीची पत्नी व काकू दोघेही गावातील मंदिर पूजेसाठी आले होते. पीडित मुलगी आणि तिची बहीण तिथे आधीच हजर होते. इथल्या एका गोष्टीवरून महिलांमध्ये भांडण चालू होते. यानंतर आरोपी व पीडितेचे वडीलही भांडणात सामील झाले आणि भांडण टोकाला गेले. यानंतर आरोपी संतप्त झाला आणि त्याने आपल्या कुटूंबाच्या  इतर मुलांना बोलावून पीडित मुलीच्या वडिलांना गोळी घातली. Out On Bail, Man Accused Of Sex Assault Kills Woman's Father In UP.

सोमवारी पीडित महिला पोलिस स्टेशनच्या बाहेर रडत आणि न्यायाची मागणी करताना दिसली. ती म्हणाली, 'मला न्याय द्या. आधी त्याने माझा विनयभंग केला आणि आता माझ्या वडिलांना गोळीबार करून ठार केलं.  तो आमच्या गावात आला. त्याच्यासमवेत सहा-सात जण होते. माझ्या वडिलांची कोणाशीही वैर नव्हते. गौरव शर्मा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी आतापर्यंत गौरव शर्माच्या कुटूंबातील सदस्यास अटक केली आहे.

Web Title: Hathras shuddered! Previously molested a girl; firing at her father after he was granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.