हॅट्स ऑफ मुंबई पोलीस! ३ वर्षांच्या चिमुकला पुन्हा विसावला आईच्या कुशीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 09:03 PM2022-01-31T21:03:40+5:302022-01-31T21:04:23+5:30
Mumbai Police : आज रोजी 11:30 वाजेच्या सुमारास महिला पोलीस उपनिरीक्षक घाडगे आणि निर्भया पथक हे व्ही. पी. रोड मोबाईल पाच वाहनाने पोलिस ठाणे हद्दीत गस्त करताना कबूतर खाना भुलेश्वर येथे एक मुलगा सापडला होता.
मुंबई : पोलिसांमुळे वाट चुकलेला चिमुकला पुन्हा आईच्या कुशीत आला आहे. व्ही. पी. रोड पोलिसांच्या निर्भया पथकाला सोमवारी सकाळच्या भुलेश्वर परिसरात एक मुलगा रडताना दिसून आला. पथकाने त्याच्याकडे चौकशी करत त्याला पोलीस ठाण्यात आणून, त्याच्या कुटुंबियाचा शोध सुरु केला. याच दरम्यान सीपी टँक परिसरात मुलाची आई मुलाबाबत शोध घेताना दिसली. त्यानुसार, पोलिसांनी मुलाला सुखरूप तिच्यापर्यंत पोहचवले आहे.
आज रोजी 11:30 वाजेच्या सुमारास महिला पोलीस उपनिरीक्षक घाडगे आणि निर्भया पथक हे व्ही. पी. रोड मोबाईल पाच वाहनाने पोलिस ठाणे हद्दीत गस्त करताना कबूतर खाना भुलेश्वर येथे एक मुलगा सापडला होता. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने देवांश(बदलेले नाव) असे नाव सांगितले. त्याला पत्ता विचारला असता पत्ता व्यवस्थित सांगता येत नव्हता. म्हणून त्याला मोबाईल पाचमध्ये बसून आसपासच्या परिसरात मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीपी टँक सर्कल येथील कोठारी हॉस्पिटल जवळ या मुलाची व नातेवाईकांचा शोध घेत असता एक महिला लहान मुलाबाबत इतरत्र विचारणा करत होते. त्यावेळी पालकांकडे खातरजमा करून ३ वर्षाच्या चिमुकल्याला पालकांकडे सुखरूप ताब्यात देण्यात आले.