डोळा फोडला, ओठ तोडले अन् नंतर गळा दाबून पत्नीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:58 AM2019-11-26T11:58:09+5:302019-11-26T12:04:20+5:30

घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण होते.

He broke his eyes, broke his lip, and then strangled his wife with a sore throat | डोळा फोडला, ओठ तोडले अन् नंतर गळा दाबून पत्नीची निर्घृण हत्या

डोळा फोडला, ओठ तोडले अन् नंतर गळा दाबून पत्नीची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्दे हत्येनंतर रचला आत्महत्येचा बनावपती, सासू, दीर ताब्यात 

सिरसाळा (जि. बीड) : डोळा फोडला, ओठ तोडले अन् नंतर गळा दाबून पत्नीची क्रूर हत्या केल्याची घटना सिरसाळा येथे एका पेट्रोलपंपाच्या मागच्या वस्तीत सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, दीर यांना ताब्यात घेतले आहे. 

नेहा सिराज पठाण (२६ ) असे मृत महिलेचे नाव आहे; तर पतीचे नाव सिराज अयुब पठाण आहे.   सिराज हा शेती व वीटभट्टीवर मजुरी करतो. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता तो कामावरुन घरी आला व पत्नी नेहाला मारहाण करु लागला.  पत्नीचा एक ओठ त्याने तोडला. त्याचवेळी डावा डोळा फोडला त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करत गळा आवळून जिवे मारले. त्यानंतर ही आत्महत्या असल्याचा बनाव त्याने केला. सायंकाळी  ५.३० वाजता  सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून हा खून असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  संशय आल्याने पोलिसांनी पती सिराज याला ताब्यात घेऊन विचारपूस केली.

खाक्या दाखविताच दिली खुनाची कबुली
पोलिसी खाक्या दाखवताच खून केल्याची कबुली सिराजने दिली. पोलिसांनी नेहाचा पती सिराज, दोन दीर, व सासू यांना ताब्यात घेतले.  घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण होते. पंचनामा केल्यानंतर नेहाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला. या खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही. मयत नेहाच्या पश्चात तीन अपत्ये आहेत.याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.  
 

Web Title: He broke his eyes, broke his lip, and then strangled his wife with a sore throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.