बाबो! हेअरकट आवडला नाही म्हणून पोरानं लावला पोलिसांना फोन अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 09:57 PM2021-05-14T21:57:34+5:302021-05-15T00:35:13+5:30

Boy calls police after bad haircut : पोलिसांना इमर्जन्सी कारण नसल्याचं कळताच या मुलाच्या बहिणीला त्याची समजूत काढण्यासाठी समजावलं.

As he did not like the hairstyle, boy called the police and ... | बाबो! हेअरकट आवडला नाही म्हणून पोरानं लावला पोलिसांना फोन अन्... 

बाबो! हेअरकट आवडला नाही म्हणून पोरानं लावला पोलिसांना फोन अन्... 

googlenewsNext
ठळक मुद्देरागाच्या भरात त्याने जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. केसांवरून हात फिरवत गोंधळ घालतच त्याने पोलिसांना फोन केला आणि बोलावलं. 

सलूनवाल्याने हेअरकट बिघडवला म्हणून  रागाच्या भरात एका १० वर्षांच्या मुलाने असाच हटके कृती केली आहे. हेअरकट आवडला नाही म्हणून त्या मुलाने चक्क पोलिसांना बोलावलं. पोलिस आल्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला. तेव्हा पोलिसांना इमर्जन्सी कारण नसल्याचं कळताच या मुलाच्या बहिणीला त्याची समजूत काढण्यासाठी समजावलं.

नेतृत्व चीनमध्ये ही घटना घडली. एका १० वर्षांच्या मुलानं त्याची नवी हेअरस्टाईल आवडली नाही म्हणून चक्क पोलिसांना बोलावल्याचे प्रकरण स्थानिक माध्यमे आणि सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. ही घटना चीनच्या नैऋत्य भागातील अंशुन शहरात घडली आहे. सलूनवाल्याने त्याचे केस कापल्यानंतर काही काळ हा मुलगा आपली नवी हेअरस्टाईल काळजीपूर्वक आरशात न्याहाळत राहिला. त्यानंतर त्याने तो समाधानी न झाल्याने निराश होऊन रागावला. रागाच्या भरात त्याने जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. केसांवरून हात फिरवत गोंधळ घालतच त्याने पोलिसांना फोन केला आणि बोलावलं. 

दरम्यान, पोलीस सलूनवाल्याच्या दुकानात पोहोचले. जेव्हा पोलिसांना हा संपूर्ण प्रकरण समजले, तेव्हा त्यात काही गंभीर आणि एमर्जन्सी न वाटल्याने मुलाच्या मोठ्या बहिणीला या प्रकरणात हस्तक्षेप करून तिच्या भावाला पोलिसांना फोन करण्यापासून का रोखले नाही असं विचारलं आणि समजूत काढण्यास सांगितले. नंतर बहिणीने आपल्या भावाची समजूत काढेन असे सांगितले. अशा छोट्या प्रकरणांमध्ये पोलिसांना बोलवून त्यांचा वेळ वाया घालवू नये, असेही सांगेन, असेही बहीण म्हणाली. या मुलाच्या बालिश कृत्यामुळे पोलिसांना विनाकारण त्रास झाला असला. मात्र, या मुलाच्या समर्थनार्थ अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 

Web Title: As he did not like the hairstyle, boy called the police and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.