लालबागच्या राजाच्या दर्शनाला पाठविले नाही म्हणून 'तो' गेला घर सोडून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 05:23 PM2019-09-11T17:23:58+5:302019-09-11T17:25:07+5:30
वडिलांनी सायकांळी उशिरा कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नवी मुंबई - कळंबोली येथे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलगा लालबागच्या राजाच्या दर्शनाला पाठवले नाही म्हणून घर सोडून गेला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. काल सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरातून निघालेला सुजन विनोद कुलकर्णी घरी न परतल्याने वडिलांनी सायकांळी उशिरा कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सुजनचे वडील विनोद कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ९ तारखेच्या रात्री सोसायटीतील सर्व मुलं लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. त्यांच्यासोबत जाण्यासाठी सुजनने हट्ट केला. मात्र, दहावीत शिकणाऱ्या सुजनला वडिलांनी पाऊस पडत असल्याने लालबागला जाण्यास अटकाव केला. त्यानंतर सुजनची निराशा झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे १० सप्टेंबरला सुजन सकाळी उठला, देवपूजा करून नाश्ता करून खाली खेळण्यासाठी गेला. तो परत घरी आलाच नाही. मी भटजी असल्याने काल बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणची पूजा सांगण्यासाठी मी सकाळी ११ वाजता घर सोडलं होतं. सायंकाळी उशिरा आल्यानंतर सुजन घरी न परतल्याने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती विनोद यांनी केला. तसेच त्यांनी पुढे फोटोतील मुलगा कुणाला सापडल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे अथवा ९३२४९३३७०९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी आवाहन केले आहे.