मेहुणीच्या प्रेमात पडला, पत्नी आणि मुलीची हत्या करून पती पोलिसांसमोर ढसाढसा रडला

By पूनम अपराज | Published: October 15, 2020 08:52 PM2020-10-15T20:52:29+5:302020-10-15T20:58:46+5:30

Double Murder : त्या व्यक्तीने मेहुणीच्या प्रेमात पडल्यामुळे स्वत: च्या पत्नी व निर्दोष मुलाची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर ढसाढसा रडण्याचे नाटक करून स्वत: ला दोषी दाखविण्याचा प्रयत्न केला.

He fell in love with his sister-in-law, killed his wife and daughter and cried in front of the police | मेहुणीच्या प्रेमात पडला, पत्नी आणि मुलीची हत्या करून पती पोलिसांसमोर ढसाढसा रडला

मेहुणीच्या प्रेमात पडला, पत्नी आणि मुलीची हत्या करून पती पोलिसांसमोर ढसाढसा रडला

googlenewsNext
ठळक मुद्दे मुलीने घटना पाहिली म्हणून त्याने मुलीचीही गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मेहुणीला बेडया ठोकल्या आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी घराबाहेर पडला. बाजारात त्याने खरेदी केली. त्यानंतर गंगेत स्नान केले. घरी येऊन तो रडण्याचे नाटक करू लागला.

प्रयागराज -उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये भाजप आमदाराच्या घराजवळ आई आणि निरपराध मुलाची दुहेरी हत्याकांड उघडकीस आली आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आरोपी हा मृत महिलेचा पती अजय याशिवाय दुसरं तिसरं कोणी नव्हतं. त्या व्यक्तीने मेहुणीच्या प्रेमात पडल्यामुळे स्वत: च्या पत्नी व निर्दोष मुलाची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर ढसाढसा रडण्याचे नाटक करून स्वत: ला दोषी दाखविण्याचा प्रयत्न केला.

 

उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये एका व्यक्तीने मेहुणीसाठी आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीच्या मोठ्या बहिणीशी आरोपीचे प्रेमसंबंध जुळले होते. यावरून पती आणि पत्नीत वारंवार भांडण होत असे. रोजच्या भांडणाला वातागून पतीने मंगळवारी पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. मुलीने घटना पाहिली म्हणून त्याने मुलीचीही गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मेहुणीला बेडया ठोकल्या आहेत.


पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या घटनेबाबत माहिती दिली. अजय साहू असे आरोपीचे नाव असून, त्याने नऊ वर्षांपूर्वी सरितासोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोघेही कौशांबी येथील महेवा परिसरात राहू लागले. त्यांना आठ वर्षांची मुलगी होती. त्याचदरम्यान मोहित याचे सरिताच्या मोठ्या बहिणीसोबत बोलणे होत असे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत सरिताला समजल्यानंतर तिने विरोध दर्शवला. यावरून पती-पत्नीचे वारंवार खटके उडायचे. मंगळवारी अजयने पत्नी सरिता आणि मुलीची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

डबल मर्डरनंतर गंगेत केले स्नान 

पोलिसांच्या माहितीनुसार, दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी घराबाहेर पडला. बाजारात त्याने खरेदी केली. त्यानंतर गंगेत स्नान केले. घरी येऊन तो रडण्याचे नाटक करू लागला. पोलिसांनी मोहितचे कॉल डिटेल्स तपासले. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अजय आणि त्याच्या मेहुणीचे फोनवर तासन् तास बोलणे व्हायचे असे पोलिसांनी कॉल डिटेल्समध्ये दिसून आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मेहुणीने अजयसोबत लग्न करण्यासाठी आपल्या पतीला सोडले होते. ती आपल्या चार वर्षांच्या मुलीसोबत राहायची. प्रेमसंबंधांतून अजयने पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचे उघड झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: He fell in love with his sister-in-law, killed his wife and daughter and cried in front of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.