नोकरीच्या बहाण्याने मुलाखतीसाठी बोलावून तरुणीवर केला गँगरेप 

By पूनम अपराज | Published: December 24, 2020 09:40 PM2020-12-24T21:40:26+5:302020-12-24T21:40:51+5:30

Gangrape : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेला नोकरी देत असल्याचे भासवून मुलाखतीसाठी मुरादाबाद येथे बोलावण्यात आले होते.

He gangraped the girl by calling her for an interview under the pretext of job | नोकरीच्या बहाण्याने मुलाखतीसाठी बोलावून तरुणीवर केला गँगरेप 

नोकरीच्या बहाण्याने मुलाखतीसाठी बोलावून तरुणीवर केला गँगरेप 

Next
ठळक मुद्देदिल्लीतील एका मुलीला नोकरीस लावण्याची बतावणी करून २ तरुणांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या कोतवाली भागात १९ डिसेंबर रोजी दिल्लीतील एका युवतीवर एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना दुसर्‍याच दिवशी म्हणजे रविवारी अटक केली. पोलिसांनी आरोपीला तुरूंगात रवानगी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेला नोकरी देत असल्याचे भासवून मुलाखतीसाठी मुरादाबाद येथे बोलावण्यात आले होते.

दिल्लीतील एका मुलीला नोकरीस लावण्याची बतावणी करून २ तरुणांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेची आई आपल्या मुलीसह घटनेची माहिती देण्यासाठी रात्री उशिरा कोतवाली पोलिस स्टेशनला पोचली . यावेळी हिंदू जागरण मंचचे नेतेही या महिलेसमवेत होते. हिंदू जागरण मंचच्या नेत्यांनी सांगितले की, उत्तराखंडमधील तरुणांनी मुलीला नोकरी देण्याच्या बहाण्याने मुरादाबाद येथे बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही मुले त्यांची नावे बदलत होती.

या घटनेच्या २४ तासांनंतर एसएसपी मुरादाबाद प्रभाकर चौधरी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, दिल्लीतील एका तरुणीने काल रात्री कोतवाली येथे तक्रार दिली की, दोन मुलांना हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आपल्याला ड्रग्सही देण्यात आल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. दोन्ही मुले उत्तराखंडमधील आहेत. याप्रकरणी अधिक पोलिस तपास करत आहेत.


 

Web Title: He gangraped the girl by calling her for an interview under the pretext of job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.