पत्नी झोपेत असताना मारला हातोडा, बेशुद्ध झाल्यानंतर कापला गळा; पतीचा खुलासा, पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:17 IST2025-04-07T10:14:45+5:302025-04-07T10:17:13+5:30

Noida Engineer Wife Murder: विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने त्याच्या इंजिनिअर पत्नीची हत्या केली. आरोपीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने सगळा घटनाक्रम सांगितला.

He hit his wife with a hammer while she was sleeping, then cut her throat after she became unconscious; Husband's revelation, police shocked | पत्नी झोपेत असताना मारला हातोडा, बेशुद्ध झाल्यानंतर कापला गळा; पतीचा खुलासा, पोलीस हादरले

पत्नी झोपेत असताना मारला हातोडा, बेशुद्ध झाल्यानंतर कापला गळा; पतीचा खुलासा, पोलीस हादरले

Engineer Wife Murder: इंजिनिअर असलेल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयाचे भूत त्याच्या डोक्यात शिरले. त्यानंतर एक दिवस झोपेत असतानाच त्याने पत्नीच्या डोक्यात हतोडा मारला आणि कायमचं संपवलं. नोएडातील सेक्टर १५ मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि चौकशी केली. आरोपीने चौकशीत हत्येचा सगळा घटनाक्रम सांगितला. थंड डोक्याने केलेल्या हत्येचा कबुल जबाब ऐकून पोलिसही हादरले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

४२ वर्षीय आसमा खानची ५५ वर्षीय नुरूल्लाह हैदर याने हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, प्रकरणाचा तपास करत आहेत. 

वाचा >>सोलापुरात चिमुकलीसमोरच वडिलांनी आईला संपवलं अन् स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

नुरूल्लाह याने पोलिसांना सांगितले की, आसमा झोपलेली होती. तेव्हा मी तिच्या डोक्यात हतोड्याने वार केला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर मी तिचा गळा चिरला.

मुलीने दिली हत्येची माहिती

मृतक महिलेच्या मेहुण्याने सांगितले की, आसमाच्या मुलीने या घटनेची माहिती दिली. गेल्या दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. पण, तिची हत्या करेल असं कधी वाटलं नव्हतं. आसमा सिव्हील इंजिनिअर होती आणि पाश परिसरातील सेक्टर १५ मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ती काम करायची.   

हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. आसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. फॉरेन्सिकच्या पथकाने घरातून पुरावे गोळा केले आहेत. आसमाचा पोस्टमार्टेम रिपोर्टही आला असून, त्यातही डोक्यात मारल्याने आसमा कोमामध्ये गेली होती, असे म्हटले आहे. 

Web Title: He hit his wife with a hammer while she was sleeping, then cut her throat after she became unconscious; Husband's revelation, police shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.