लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अमित शाहांचा PA बनून मंत्र्यांकडे अशी मागणी केली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 06:42 PM2020-07-23T18:42:06+5:302020-07-23T18:45:16+5:30
गुन्हे शाखेकडे थेट गृह मंत्रालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, एक व्यक्ती हरियाणा आणि राजस्थानच्या कामगार मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे बनावट पीए बनून कॉल करत आहे.
जयपूर - गृहमंत्री अमित शहा यांचे पीए बनून राजस्थान - हरियाणाच्या मंत्र्यांना कॉल करणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. संदीप चौधरी नावाचा हा माणूस गृहमंत्री यांचा बनावट पीए स्वतःला म्हणून घेत होता. या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंड नावे सिमकार्ड घेतले होते आणि तो आपणास नोकरी मिळवण्यासाठी कॉल करत होता.
अलवरच्या मुंडावर येथील 25 वर्षीय संदीप चौधरी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या गावातून अटक केली आहे. संदीपने बीए आणि बीएड केले आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यापूर्वी गुन्हे शाखेकडे थेट गृह मंत्रालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, एक व्यक्ती हरियाणा आणि राजस्थानच्या कामगार मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे बनावट पीए बनून कॉल करत आहे. त्याने कॉलवर कोणातरी नोकरीस लावण्यास सांगितले.
त्याच्या अटकेनंतर संदीपने पोलिसांना सांगितले की, यापूर्वी तो धारूहेरा येथील हिरो होंडाच्या कार्यालयात काम करायचा, पण कोविडमुळे त्याची नोकरी गेली. त्यांनी राजस्थान आणि हरियाणाच्या कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी जुगाड करण्याचा विचार केला आणि गृहमंत्री यांचा बोगस पीए बनून हरियाणाचे कामगार मंत्री अनूप धनक आणि राजस्थानचे कामगार मंत्री टीकाराम जुली यांना कॉल केला. कॉल करण्यासाठी त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या नावे एमटीएनएलचे सिमकार्ड घेतले आणि नंतर त्याच नंबरवरुन मंत्र्यांना कॉल केले. त्याच्याकडून पोलिसांनी एमआय स्मार्टफोन आणि एक सिमकार्ड जप्त केले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा
मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी
कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी
विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं
कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा