‘त्याने’ मालकालाच बनविले दाऊदचा हस्तक, पंतप्रधानांना धोका असल्याचा संदेश पाठवला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:40 PM2022-11-23T13:40:38+5:302022-11-23T13:41:14+5:30

या संदेशामध्ये चॅट करणारी व्यक्ती ही दाऊद इब्राहिमची हस्तक मुस्तफा अहमद आणि नवाज हे असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत. तसेच, देशात घातपात घडवून आणणार आहेत. त्यांनी मला माझा पगार दिला नसून मला वेडे बनविले असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

He made the owner Dawood's underling | ‘त्याने’ मालकालाच बनविले दाऊदचा हस्तक, पंतप्रधानांना धोका असल्याचा संदेश पाठवला 

‘त्याने’ मालकालाच बनविले दाऊदचा हस्तक, पंतप्रधानांना धोका असल्याचा संदेश पाठवला 

googlenewsNext

मुंबई : वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवाला धोका असल्याचा संदेश धडकताच  खळबळ उडाली. यंत्रणांनी तपास सुरू केला. मात्र, प्राथमिक तपासात वर्षभरापूर्वी मानसिक रुग्ण ठरवून मालकाने कामावरून काढल्याच्या रागात कामगारानेच मालकाला दाऊदचा हस्तक असल्याचे सांगून संदेश पाठविल्याची माहिती समोर आली. 

वरळी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनच्या ८४५४९९९९९९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर एका मोबाईलधारकाने रविवारी सात ऑडिओ क्लिप पाठविले. तसेच, सुप्रभात बेज नावाच्या आधार कार्डचा फोटो, नवाज अकू कबर नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर असलेले बिस्मा डायमंडचे व्हिजिटिंग कार्ड, केरळ पोलिसांचा कोविड २०१९ चा फोटोपास, असे फोटोग्राफही पाठविले. पुन्हा दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास व्हॉट्सॲप चॅटमध्ये १२ ऑडिओ क्लिप, तीन फोटो, कंपनीतील फ्रेंड सर्कलचे फोटो, तसेच चार व्हॉट्सॲपचे टाईप केलेले मेसेज असा मजकूर पाठविला. 

या संदेशामध्ये चॅट करणारी व्यक्ती ही दाऊद इब्राहिमची हस्तक मुस्तफा अहमद आणि नवाज हे असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत. तसेच, देशात घातपात घडवून आणणार आहेत. त्यांनी मला माझा पगार दिला नसून मला वेडे बनविले असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

कामगाराला दिसायचे भूत -
- पोलिसांनी तत्काळ संबंधित व्हिजिटिंग कार्डवरील बिस्मा डायमंड कंपनीचे मॅनेजर नवाज अबू बकर यांना संपर्क साधून नमूद चॅट करणाऱ्या आधार कार्डवरील व्यक्तीबाबत चौकशी केली. 
- तेव्हा, सुप्रभात बेज नावाची व्यक्ती दोन वर्षांपूर्वी  कालिकत, केरळ येथील बिस्मा डायमंड कंपनीमध्ये सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करत होता. एक वर्षापूर्वी त्याला वेगवेगळे भास होऊ लागले. 
- भूत आले, कुणीतरी मारतोय, असे त्याला वाटत होते. मानसिक आजारामुळे त्याला कामावरून काढून टाकल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. प्राथमिक तपासात याच रागातून त्याने संदेश पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: He made the owner Dawood's underling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.