प्रेमविवाह केला अन् दोन महिन्यांनी पत्नीचा गळाच चिरला, मक्याच्या शेतामध्ये फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:13 IST2025-03-28T19:12:33+5:302025-03-28T19:13:30+5:30
Crime News: एकमेकांवर प्रेम जडलं. नंतर दोघांनी प्रेमविवाह करून संसार सुरू केला. पण, अचानक वाद झाला अन् प्रेमाचा भयंकर शेवट झाला.

प्रेमविवाह केला अन् दोन महिन्यांनी पत्नीचा गळाच चिरला, मक्याच्या शेतामध्ये फेकला मृतदेह
Crime news in Marathi: कुटुंबीयांचा विरोध असताना पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांनी प्रेमविवाह केला. दोन महिन्यांपूर्वी दोघांचा संसार सुरू झाला, पण एक वादाची ठिणगी पडली आणि प्रेमाचा भयंकर शेवट झाला. भांडण सुरू असताना राग अनावर होऊन पतीने पत्नीचा गळाच चिरला. त्यानंतर मृतदेह मक्याच्या शेतात फेकला. त्यानंतर आरोपी आपल्या कुटुंबासह फरार झाला. या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर पोलिसांनी शेतातून मृतदेह ताब्यात घेतला. बिहारमधील सहरसा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील सौरबाजार ठाण्याच्या हद्दीत सहुरिया पश्चिममध्ये ही घटना घडली. सिमराहा टोला वार्ड क्रमांक ६ मध्ये गुरूवारी (२७ मार्च) रात्री पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर पतीने रागाच्या भरात धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घराबाहेर लोक गोळा होताच, चादरी गुंडाळला मृतदेह
दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून भाविकीतील लोक घराबाहेर जमा झाले. तोपर्यंत पतीने पत्नीची हत्या केली होती. बाहेर लोक गोळा झाल्याने आरोपीने पत्नीचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळला आणि मागच्या बाजूने नेऊन मक्याच्या शेतात फेकला. त्यानंतर आरोपीसह कुटुंबातील सगळे फरार झाले.
हेही वाचा >>सुनेच्या मदतीनं वासनांध बापानं पोटच्या पोराला संपवलं; अनैतिक संबंधांना ठरत होता अडसर
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह फेकलेल्या शेतात शोध घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. दोघांमध्ये भांडण कोणत्या कारणावरून झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह
मृत महिलेचा आरोपी विकास कुमारसोबत आंतरजातीय प्रेमविवाह होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी विवाह केला आणि सिमराहा गावात राहत होते. मृत महिलेचे माहेर मधेपूर जिल्ह्यातील मुरलीगंज आहे.