१५ वर्षापासून खोटं बोलून थकला; पोलिसांना फोन लावला अन् जे सांगितलं त्याने धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 10:48 AM2023-06-05T10:48:45+5:302023-06-05T10:49:29+5:30
टोनी गेल्या कित्येक वर्षापासून खोटे बोलून थकला होता. त्याला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता.
आयुष्यात खोटं बोलून वैतागलेल्या माणसाने स्वत: पोलिसांना फोन करून १५ वर्षापूर्वी केलेल्या एका गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याबाबत माणसाने पोलिसांना सांगताच ते हैराण झाले. इतकी वर्ष हा गुन्हा माणसाने सगळ्यांपासून लपवून ठेवला होता. ३७ वर्षीय टॉनी पेरालटा याने पोलिसांना फोन करून ही गोष्ट सांगितली तेव्हा पोलिसांनी डिसेंबर २००८ बेपत्ता प्रकरण बंद केले होते.
हे प्रकरण ६० वर्षीय विलियम ब्लॉजगेट यांचे आहे जे अचानक बेपत्ता झाले होते. विलियम यांचा मृतदेह सापडला नाही आणि या प्रकरणात कुणालाही अटक झाली नाही. टॉनीने १ मे रोजी रोजवेल पोलिसांना फोन केला. अमेरिकेत तो एका स्टोअरमध्ये उपस्थित होता. पोलिसांना तो धूम्रपान करताना आढळला होता. टोनी गेल्या कित्येक वर्षापासून खोटे बोलून थकला होता. त्याला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता.
मिरर यूके रिपोर्टनुसार, टोनी स्वत: पोलिसांकडे गेला, दोन्ही हात मागे केले. सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांना टोनीने कबुल केलेल्या गुन्ह्यावर संशय होता कारण तो हत्येबाबत आधीची माहिती त्याला आठवत नव्हती. परंतु पोलिसांनी टोनीला घटनास्थळी घेऊन गेली ज्याठिकाणी टोनीने घरमालकाचा खून केला होता. तपासावेळी पोलिसांना घरात बूट, हाडे, खोपडी आणि बेपत्ता व्यक्तीचा मोबाईल आढळला. त्यानंतर त्याची ओळख पटली.
टोनीने घरमालकाचा खून करून त्याचा मृतदेह घरातच पुरला होता. त्याने सांगितले की, घरमालक खूप चांगला होता. परंतु त्याने एकदा ड्रग्सचा नशा केला होता. त्याला कुठलेही भान नव्हते त्यासाठी विनाकारण मी त्याला मारून टाकले. ही हत्या स्क्रू ड्रायव्हरने केली. ब्लॉजगेट ३ जानेवारी २००९ वेळी बेपत्ता झाले. त्यांचे कुटुंब १० दिवसांपासून त्याला शोधत होते. पण ते सापडले नाहीत. तपासात पोलिसांनी ब्लॉजगेटचे घरमालकासोबत वाद होते. त्याला तो घरातून काढणार होता असं कळाले. पोलिसांनी तेव्हा टोनीची चौकशी केली परंतु कुठलेही पुरावे नसल्याने काहीच हाती लागले नाही. आता १५ वर्षांनी त्याने स्वत: या हत्येची कबुली दिली. आता पोलीस या प्रकरणी पुन्हा फेरतपास करून टोनीला अटक केली आहे.