सदनिका विक्रीच्या नावाखाली १४ लाख घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:25 AM2020-07-08T00:25:32+5:302020-07-08T00:26:58+5:30

बनावट कागदपत्रांच्या आधारे एका सदनिकेची विक्री करून दोघांनी जरीपटक्यातील एका व्यापाºयाची फसवणूक केली. या प्रकरणी त्रिमूर्ती नगरातील साऊरकर बंधूंविरुद्ध जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

He took Rs 14 lakh in the name of selling the flat | सदनिका विक्रीच्या नावाखाली १४ लाख घेतले

सदनिका विक्रीच्या नावाखाली १४ लाख घेतले

Next
ठळक मुद्देजरीपटक्यातील व्यापाऱ्याची फसवणूक : चार वर्षानंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका सदनिकेची विक्री करून दोघांनी जरीपटक्यातील एका व्यापाºयाची फसवणूक केली. या प्रकरणी त्रिमूर्ती नगरातील साऊरकर बंधूंविरुद्ध जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
राजू श्रीकृष्णराव साऊरकर आणि सतीश श्रीकृष्णराव साऊरकर अशी आरोपींची नावे आहेत. जरीपटक्यातील इलेक्ट्रॉनिकचे व्यापारी सचिन सुरेश काचेला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची त्रिमूर्तीनगरातील सावरकर बंधूंसोबत जुनी ओळख होती. या ओळखीच्या आधारे त्यांनी सोमलवाड्यातील संत तुकडोजी सहकारी गृहनिर्माण संस्था नागपूर येथे असलेली अन्नपूर्णा चारमधील एक सदनिका काचेला यांना दाखविली. ती विकायची आहे, असे सांगून आरोपी साऊरकर बंधूंनी काचेला यांच्यासोबत ५ सप्टेंबर २०१६ ला करारनामा केला. त्यानंतर रोख आणि धनादेशाद्वारे एकूण १४ लाख रुपये घेतले आणि खोटे विक्री करारनामा व कब्जापत्र करून काचेला यांची फसवणूक केली. तब्बल चार वर्षानंतर ही फसवणुकीची घटना उघडकीस आली. त्यानंतर काचेला यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी साऊरकर बंधूंची चौकशी सुरू आहे.

Web Title: He took Rs 14 lakh in the name of selling the flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.