त्याने तिला काश्मीर, दिल्ली फिरवले.. तिने त्याला थेट ‘जेलवारी’घडवली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 08:53 PM2018-12-13T20:53:31+5:302018-12-13T20:55:25+5:30
आरोपीने त्याच्याजवळील दोन्ही मोबाईलचा वापर टाळून कोणत्याही बँक, गॅस एजन्सी, किंवा इतर साधनांचा वापर करण्याचे टाळले होते.
हडपसर : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन दिल्ली येथे फिरणाऱ्या आरोपीस हडपसरपोलिसांनी शिताफीने दिल्लीपोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. गणेश बाळनाथ गोरे( वय २३ वर्षे रा. सर्वे नंबर, 97 कल्पतरू निवास, घुले कॉलनी, ढेरे बंगला, मांजरी ) असे अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.आरोपी गणेश गोरे याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन जम्मू-काश्मीर, दिल्ली या राज्यात फिरत असल्याचे माहिती हडपसर पोलीसांना समजली. त्यानुसार हडपसर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी, पोलीस शिपाई सुशांत गायकवाड, महिला पोलीस छाया भिसे यांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने दोन दिवस सापळा रचून आरोपीस व पीडित मुलीस सुलतानपूर दिल्ली येथून ताब्यात घेतले.या दरम्यान आरोपी दिल्ली न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाकडून रिमांड घेऊन पुणे येथे आणले आहे, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलमानुसार आरोपीला कोर्टात हजर केले असता १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे.दाखल गुन्ह्यांचा तपास करीत असताना आरोपीने त्याच्याजवळील दोन्ही मोबाईलचा वापर टाळून कोणत्याही बँक, गॅस एजन्सी, किंवा इतर साधनांचा वापर करण्याचे टाळले होते. त्यामुळे आरोपीचा व पीडित मुलीचा ठावठिकाणा लागणे कठीण असताना तपास अधिकारी प्रताप गिरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष तपास व बातमीदारामार्फत कौशल्याने तपास करून आरोपीपर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले.ही कामगिरी परिमंडल ५ चे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, गुन्हे चे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रताप गिरी, पोलीस हवालदार सुशांत गायकवाड, महिला पोलीस शिपाई छाया भिसे यांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने केली.
.............
आरोपीने त्याच्याजवळील दोन्ही मोबाईलचा वापर टाळून कोणत्याही बँक, गॅस एजन्सी, किंवा इतर साधनांचा वापर करण्याचे टाळले होते. त्यामुळे आरोपीचा व पीडित मुलीचा ठावठिकाणा लागणे कठीण गेले.