डोक्यावर हातोड्याने घाव, चाकूने गळा आणि तोंड कापले, दातही तोडले... पत्नीची हत्या करून पतीनेच पोलीस स्टेशन गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 09:57 PM2022-04-14T21:57:02+5:302022-04-14T21:57:53+5:30
Murder case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने घाव घेतले आणि नंतर तिचा गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
वास्तविक, मेरठच्या कंकरखेडा पोलीस स्टेशन परिसरातील शिवलोक पुरी येथील रहिवासी देवेंद्र सिंह याचे लग्न प्रतिमासोबत झाले होते. त्यांना 10 वर्षांचा मुलगाही आहे. प्रतिमा सरधना येथील नानू गावातील प्राथमिक शाळेत सरकारी शिक्षिका होत्या. पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. पतीही दारू प्यायचा आणि अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडण व्हायचे, हाणामारीपर्यंत परिस्थिती पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
10 वर्षीय मुलगा आशू याने सांगितले की, तो सकाळी मोबाईलमध्ये गेम खेळत होता, यासाठी आईने त्याला शिवीगाळ केली आणि शाळेचा गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून मारहाण केली. इतक्यात त्याचे वडीलही तिथे पोहोचले. वडिलांचे डोके दुखत होते. मुलाच्या मारहाणीवरून पती-पत्नीमधील वाद वाढला.
मुलाच्या म्हणण्यानुसार, वडिलांनी आईच्या डोक्यावर मागून हातोड्याने वार केले आणि नंतर चाकूने पत्नीचा गळा आणि तोंड कापले. मुलाच्या म्हणण्यानुसार त्याने आपल्या पत्नीचे सर्व दात हातोड्याने तोडले. मुलाने सांगितले की, तो वडिलांना आईला सोडण्यासाठी विनवणी करत होता पण वडिलांनी मुलाला खडसावले आणि गप्प बसण्यास सांगितले आणि पत्नीला मारले आणि तिला ब्लँकेटने झाकले.
पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने मुलासह पोलिस ठाणे गाठले आणि तेथे जाऊन पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलीस त्याच्या घरी पोहोचले जिथे खोलीत महिलेचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि हातोडाही जप्त केला आहे. माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.
एसपी सिटी विनीत भटनागर सांगतात की, पत्नीची हत्या केल्यानंतर पती स्वत: पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला असून चौकशीत त्याने सांगितले की, कोरोनाच्या काळात त्याचा व्यवसाय संपुष्टात आला होता, त्यामुळे वाद झाला होता, गुन्हा नोंदवून तपास करण्यात येणार आहे.