पश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवल घातपात कटात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 05:19 PM2020-01-23T17:19:31+5:302020-01-23T17:27:16+5:30
न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई - नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठा तसेच पुण्यातील २०१७ सालच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटातील पाहिजे असलेल्या आरोपीला कोलकत्ता येथून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कोलकाता एसटीएफ आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने २० जानेवारी रोजी अटक केली. या आरोपीचे नाव प्रताप जुदीष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) असं आहे.
हाजरा हा मूळचा पश्चिम बंगाल येथील उष्टी जिल्ह्यातील नैनानपूर येथील राहणारा आहे. हाजराला महाराष्ट्र एटीएस पथकाने पश्चिम बंगालमधील उष्टी येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट २०१८ साली याप्रकरणी भा. दं. वि. कलम १२० (ब), २१२, ११५, ४६८, ४७१, ३७९, २०१, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा १९६७, दुरुस्ती २००८ कलम १६, १८, १८ (अ), १८ (ब), १९, २०, २३, स्फोटक पदार्थांचा कायदा ४, ५, स्फोटकाचा कायदा १८८४ कलम ९ (ब), आर्म्स ऍक्ट कमळ ३, ५, ७, २५, २७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात १२ आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींविरोधात ५ डिसेंबर २०१८ साली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 23, 2020
या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी प्रताप हाजरा हा गुन्हा झाल्यापासून फरार होता. तेव्हापासून महाराष्ट्र एटीएस त्याच्या मागावर होते. २०१७ साली डिसेंबर अखेरीस पुण्यातील बावधन येथे आयोजित सनबर्न फेस्टिवल या कार्यक्रमात घातपात घडवून उधळून लावण्याच्या कटात तो सामील होता. अखेर हाजराचा एटीएस शोध घेत त्याला कोलकत्ता येथून बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.