‘आय लव्ह यू’ म्हणून त्याने ५०० रुपयांची पैज तर जिंकली पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:09 PM2021-04-23T20:09:34+5:302021-04-23T20:13:04+5:30

Molestation Case : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा

He won a bet of Rs.500 as 'I love you' but ... | ‘आय लव्ह यू’ म्हणून त्याने ५०० रुपयांची पैज तर जिंकली पण... 

‘आय लव्ह यू’ म्हणून त्याने ५०० रुपयांची पैज तर जिंकली पण... 

googlenewsNext
ठळक मुद्दे१४ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४(ड), ३४१, ३४ सहकलम १२ पोक्सो कायदानुसार गुन्हा  नोंदविला. पोलीससूत्रानुसार, पीडित मुलगी मैत्रिणीसोबत मंदिरातून घरी जात असताना तीन मुले रस्त्यावर उभी होती.

अमरावती : रस्त्याने जात असलेल्या अल्पवयीन मुलीला अडवून अल्पवयीन मुलाने थेट प्रपोज करीत ‘आय लव्ह यू’ म्हटले, घाबरून मुलगी पुढे जाताच इतर दोन मित्राला मी ५०० रुपयांची बेट(शर्यत)  जिंकला म्हणाला तसेच मुलीची छेडखानी केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील एका नगरात बुधवारी रात्री घडली. 


याप्रकरणी पोलिसानी दोन अल्पवयीनांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. १४ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४(ड), ३४१, ३४ सहकलम १२ पोक्सो कायदानुसार गुन्हा  नोंदविला. पोलीससूत्रानुसार, पीडित मुलगी मैत्रिणीसोबत मंदिरातून घरी जात असताना तीन मुले रस्त्यावर उभी होती.


एका अल्पवयिन मुलाने  हात आडवा करून मुलीला अडविले. तसेच ‘आय लव यू’  म्हटले. मुलगी घाबरून पुढे गेली. मात्र, असे म्हणाल्याची इतर मित्रासोबत लावलेली ५०० रुपयांची पैज तो जिंकला व ते पैसे दे, असे म्हणाला. सदर मुले हे नेहमीच टवाळखोरी करून चिडीमारी करतात, असे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.

Web Title: He won a bet of Rs.500 as 'I love you' but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.