अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 06:47 PM2020-08-06T18:47:12+5:302020-08-06T18:47:38+5:30
गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.
ठाणे : कोविड रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ आणि धमकावले प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी अर्ज केल्यानंतर ठाणे न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मनसेने जिल्हा सत्र न्यायालयात जमीन अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरुवारी कोर्टात सुनावणी आणि युक्तीवाद होणार होता. मात्र कापूरबावडी पोलिसांनी न्यायालयात मुसळधार पावसाची सबब पुढे करून रिपोर्ट सादर न केल्याने न्यायालयाने अविनाश जाधव यांची आजची सुनावणी पुढे ढकलली. आता ही सुनावणी आणि युक्तीवाद शुक्रवारी दोन्ही पक्षाचा न्यायालयात होणार आहे. दरम्यान अविनाश जाधव यांच्या जमीन अर्जावर गुरुवारी न्यायालयात युक्तीवाद होणार होता. मात्र कापूरबावडी पोलिसांचा रिपोर्ट आला नसल्याने न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीच्या वेळ दिलेली आहे. मात्र कापूरबावडी पोलिसांनी न्यायालयात अतिवृष्टीचे दिलेलं करण योग्य नसून अन्य पोलीस ठाण्याचे रिपोर्ट मात्र अतिवृष्टी असताना आले मात्र कापूरबावडी पोलिसांचा रिपोर्ट न आल्याने सुनावणी आणि युक्तीवाद होऊ शकला नाही तो उद्या शुक्रवारी होईल आणि निश्चितच अविनाश जाधव यांच्या जामीन मंजूर होईल अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी व्यक्त केली.
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली pic.twitter.com/sxcnApCGpg
— Lokmat (@MiLOKMAT) August 6, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी
रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या
संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या