निर्दयी बापाचं काळीज! चार वर्षाच्या मुलीच्या रडण्याला कंटाळून केली हत्या, मृतदेह टाकला टेम्पोत
By पूनम अपराज | Published: October 30, 2020 06:20 PM2020-10-30T18:20:17+5:302020-10-30T18:21:02+5:30
Murder : निर्दोष चमुकलीचा दोष इतकाच होता की, ती चिमुकली घराबाहेर पडलेल्या आई आणि भावाच्या आठवणीत रडत होती. याला कंटाळून वडिलांनी मुलीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली.
गाझियाबादच्या साहिबाबादमधील खोडाच्या नेहरू गार्डन भागात वडिलांनी गुरुवारी आपल्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. निर्दोष चमुकलीचा दोष इतकाच होता की, ती चिमुकली घराबाहेर पडलेल्या आई आणि भावाच्या आठवणीत रडत होती. याला कंटाळून वडिलांनी मुलीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली.
यानंतर आरोपी बापाने टेम्पोमध्ये मुलीचा मृतदेह टाकला आणि पत्नीचा शोध घेण्यासाठी नोएडाच्या दिशेने गेला. दरम्यान, आरोपीच्या धाकट्या भावाने बहीण गायब झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नोएडा पोलिसांनी आरोपी वडिलांना सेक्टर -11 मधून पकडून त्याला खोडा पोलिसांच्या स्वाधीन केले. वासुदेव गुप्ता खोडाच्या नेहरू गार्डन भागात राहतो. तो मूळचा सुलतानपूरचा असून तो टेम्पो चालवितो. त्याची पत्नी स्पा सेंटरमध्ये काम करते. सुमारे वीस दिवसांपूर्वी पत्नी आपल्या तीन वर्षाच्या मुलासह घर सोडून गेली.
तिने आपल्या चार वर्षाची मुलगी आदितीला घरी सोडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अदिती आई आणि भावाच्या आठवणीने रडत होती. वासुदेव मुलगी शांत करत होता पण मुलगी गप्प बसत नव्हती. रागाच्या भरात वासुदेवने मुलीचा गळा आवळून तिचा मृत्यू झाला. यानंतर वासुदेव आपल्या टेम्पोमध्ये मुलीचा मृतदेह घेऊन पत्नीचा शोध घेण्यासाठी निघाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वासुदेवचा भाऊ त्याच्या घरी आला आणि घरी दोघेही दिसले नाहीत. त्यानंतर त्याने दोघेही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली.
टेम्पोमधून मुलीचा मृतदेह फिरवत होता
टेम्पोसह आरोपीला पोलिसांनी नोएडा सेक्टर -11 मध्ये अटक केली. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता मुलीचा मृतदेह त्यात सापडला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यानंतर नोएडा पोलिसांनी आरोपी वडिलांना खोडा पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस स्टेशन खोडाचे एसएचओ असलम यांनी दिली. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिस मुलाच्या आईचा शोध घेत आहेत.