हृदयद्रावक! घरात 41 कोब्रा सापडले; वनविभाग आला नाही, अखेर गावकऱ्यांनी 'हा' निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 10:31 PM2021-07-24T22:31:23+5:302021-07-24T22:31:59+5:30

Cobra Snake's found in House: रामकोलाच्या अमडरिया गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. विनोद गुप्ता यांच्या घरातून एकेक करून 41 हून अधिक विषारी साप बाहेर येऊ लागले.

Heartbreaker! 41 cobras found in house; The forest department did not come, villagers killed all snakes | हृदयद्रावक! घरात 41 कोब्रा सापडले; वनविभाग आला नाही, अखेर गावकऱ्यांनी 'हा' निर्णय घेतला

हृदयद्रावक! घरात 41 कोब्रा सापडले; वनविभाग आला नाही, अखेर गावकऱ्यांनी 'हा' निर्णय घेतला

Next

उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका घरातून 41 कोब्रा साप मिळाले. घरातून एका मागोमाग एक असे साप बाहेर पडू लागले, त्यांना पाहून गावकऱ्यांची भंबेरी उडाली आणि दहशतीचे वातावरण पसरले. या सापांना लोकांनी मारले, परंतू आणखी साप निघतील या भीतीने गावकऱ्यांची गाळण उडाली आहे. (41 Cobra killed by villagers in Uttar Pradesh after Forest department no gave help. )

रामकोलाच्या अमडरिया गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. विनोद गुप्ता यांच्या घरातून एकेक करून 41 हून अधिक विषारी साप बाहेर येऊ लागले. यामुळे आजुबाजुला राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरली. हे सर्व साप कोब्रा प्रजातीचे होते. विनोदच्या घरातून शुक्रवारी तीन साप बाहेर पडले. यानंतर शनिवारी आणखी एक साप बाहेर आला. गुप्ता यांना घरात आणखी साप असण्याचा संशय आला. त्यांनी लगेचच शेजाऱ्यांच्या मदतीने घरातील जमीन खोदली. खड्ड्यात 41 हून अधिक साप आणि त्याची अंडी दिसून आली आणि गावकरी गांगरले. 

घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोब्रा सापडल्याचे वृत्त गावात पसरले आणि गर्दी उसळली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून काहीच मदत मिळाली नाही. एवढ्या सापांचे करायचे काय असा प्रश्न गावकऱ्यांना पडला. यामुळे त्या सर्व सापांना मारून जमिनीत पुरण्यात आले. आता गुप्ता यांचे कुटुंब या घरात राहण्यास घाबरत आहेत. कारण कोणता तरी साप बदला घेण्याची शक्यता त्यांना वाटत आहे. 

असाच एक प्रकार संतकबीर नगर जिल्ह्यात समोर आला आहे. येथे एकाच घरात 40 साप आणि त्यांची 90 अंडी सापडली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर साप सापडल्यामुळे संपूर्ण गावात दहशत पसरली. मात्र या ठिकाणी सापांना पकडणाऱ्या टीमला पाचारण करण्यात आले. घरातून सुरुवातीला तीन साप आले होते. या टीमने बऱ्याच प्रयत्नानंतर सर्व साप पकडले आणि सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
 

Web Title: Heartbreaker! 41 cobras found in house; The forest department did not come, villagers killed all snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.