हृदयद्रावक! कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने चिमुकलीसह संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 16:59 IST2021-10-02T16:52:18+5:302021-10-02T16:59:18+5:30
Suicide Case : सात वर्षीय चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

हृदयद्रावक! कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने चिमुकलीसह संपविले जीवन
नाशिक : "पप्पांची सतत आठवण येते, पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ'' असे चिमुकलीने सांगितल्यानंतर आईने चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविले.
कोराेनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पतीचा विरह सहन होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील विनयनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या सात वर्षीय चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.
सुजाता प्रविण तेजाळे (३६) व अनया प्रविण तेजाळे (७, दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर) असे या मायलेकीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १) राेजी सुजाता व अनया यांनी संगनमताने चर्चा करुन आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिट्ठीतून समोर आले आहे. सुजाता यांनी लिहिलेली सुसाईड नाेट पाेलिसांच्या हाती लागली असून सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे सुजाताच्या घरी गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.