हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 12:45 PM2020-06-26T12:45:15+5:302020-06-26T12:47:17+5:30
ही घटना इंदिरापुरमच्या ज्ञान खंड १ ची आहे. सकाळीच एका मेसेजद्वारे जोडप्याच्या आत्महत्येबाबत एका नातेवाईकाला माहिती मिळाली.
गाझियाबाद - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. फ्लॅट उघडल्यानंतर पोलीस आत प्रवेश केला तेव्हा डोळ्यात अश्रू आणणारे दृश्य होत. ८ महिन्यांचे बाळ घरात एकटेच रांगताना सापडले. निखिल आणि पल्लवी असं या आत्महत्या केलेल्या पती - पत्नीचं नाव आहे. ही घटना इंदिरापुरमच्या ज्ञान खंड १ ची आहे. सकाळीच एका मेसेजद्वारे जोडप्याच्या आत्महत्येबाबत एका नातेवाईकाला हे माहिती मिळाली. ते नातेवाईक ग्रेटर नोएडा येथे राहतात.
अद्याप आत्महत्येमागचे कारण समोर आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. या दाम्पत्याला एक ८ महिन्यांचा मुलगा आहे. जे बाळ देखील एकटा घरी आढळले होते. पोलिसांनी सांगितले की, पत्नीने ड्रॉईंग रूममध्ये आणि पतीने बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे निखिलने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने बहिणीला मेसेज केला होता की, घरी मुलगा एकटाच आहे.
यापूर्वी २३ जून रोजी नोएडाच्या सेक्टर ४९ परिसरातील बरौला गावात एका युवकाने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. कुटुंबियांनी त्या तरुणांना गळफास घेतलेल्या अवस्थेत खाली घेऊन त्याला नोएडाच्या जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही माहिती पोलिसांनी दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...
धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या
उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या
५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा