हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:21 PM2022-02-23T19:21:25+5:302022-02-23T19:30:14+5:30
Murder Case : या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला.
महाराष्ट्रातील चंद्रपूरमधून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे आईने सुपारी देऊन गरोदर मुलीची हत्या केली. आरोपींनी हत्येला आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करू शकले नाहीत. या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनीअटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला.
पतीपासून विभक्त राहत असल्याने आईनेच आपल्या गर्भवती मुलीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. समाजात कोणतीही बदनामी होऊ नये म्हणून त्याने आपल्या दोन नातेवाईकांना मारण्याची सुपारी दिली आणि मुलीला विहिरीत ढकलले. त्यानंतर त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला आहे. पोलिसांनी संशयावरून त्यांची कडक चौकशी केली असता हत्येचा कट उघड झाला.
असा खुनाचा कट उघडकीस आला होता
तेलंगणात राहणारी महिला महाराष्ट्रात येऊन आत्महत्या का करेल असा संशय पोलिसांना होता. या संशयाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. मृत महिलेच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली असता, तिचे नातेवाईक दाम्पत्य घटनास्थळाजवळील गावात राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या आईने तिचे नातेवाईक सिन्नू अजमेरा आणि शद्रा यांना हत्येची सुपारी दिली होती. ३० हजार रुपयांना हा सौदा ठरला आणि 5 हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले. सुपारी घेणाऱ्या दाम्पत्याने ठरलेल्या कालानुसार प्रसूतीचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेला निर्जनस्थळी नेले होते.
महिलेच्या डोक्यात दगड घातला
पोलिस निरीक्षक राहुल चौहान यांनी सांगितले की, महिलेच्या डोक्यावर दगडाने जबर मार लागला आणि ती खाली पडली. तिला पुन्हा विहिरीत खाली फेकले. खून केल्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले. या खुनात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे.