क्रूरतेचा कळस...प्राथमिक शाळेच्या आठ विद्यार्थ्यांची चाकू भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 03:48 PM2019-09-03T15:48:04+5:302019-09-03T15:48:24+5:30

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला आहे.

height of the brutality ... knife attack on eight elementary school students in china | क्रूरतेचा कळस...प्राथमिक शाळेच्या आठ विद्यार्थ्यांची चाकू भोसकून हत्या

क्रूरतेचा कळस...प्राथमिक शाळेच्या आठ विद्यार्थ्यांची चाकू भोसकून हत्या

Next

बिजिंग : चीनमध्ये एका व्यक्तीने क्रूरपणे चाकू मारून प्राथमिक शाळेच्या आठ मुलांची हत्या केली आहे. या हल्ल्यावेळी दोन मुले जखमी झाली आहेत. धक्कादायक म्हणजे ही व्यक्ती नुकतीच तुरुंगातून बाहेर आली होती. ही घटना सोमवारी सकाळी घडली. 


चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनुसार नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला आहे. हुवेई प्रांताच्या ब्यांगपिंग शहरातील चौयांगपो ग्रेड स्कूलमध्ये ही घटना घडली. या 40 वर्षांच्या निर्दयी आरोपीला लगेचच ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीने प्रेमिकेचा डोळा फोडल्याच्या गुन्ह्यामध्ये आठ वर्षे तुरुंगात काढली होती. तो याच वर्षी तुरुंगातू सुटला होता. या घटनेमुळे शाळेविरोधात पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सोशल मिडीयावर अनेकांनी शाळांतील सुरक्षा वाढविण्याचे म्हटले आहे. 


गेल्या काही वर्षांपासून अशा लोकांद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला करण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. आरोपी अशा हल्ल्यांकडे अनेकदा समाजाचा बदला घेण्याच्या रुपात बघत असल्याचे समोर आले आहे. एप्रिलमध्ये चीनच्या हुनान प्रांतातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाला होता. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. 


माजी विद्यार्थ्याने केली हत्या
अशाचप्रकारे बिजिंगमध्ये एका व्यक्तीने हातोडा घेऊन 20 विद्यार्थ्यांना जखमी केले होते. गेल्या वर्षी उत्तर-पश्चिमी शानक्सी भागात एका माध्यमिक शाळेच्या बाहेर हल्लेखोराने नऊ विद्यार्थ्यांची हत्या केली होती. तो या शाळेचा माजी विद्यार्थी होता. त्याने बदला घेण्यासाठी हा हल्ला केला होता. 

Web Title: height of the brutality ... knife attack on eight elementary school students in china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.