"हॅलो मी देव आहे, स्वर्गाच्या बँकेत पैसे जमा करा..."; 6 वर्षात महिलेकडून लुटले 2.76 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:22 AM2023-07-15T10:22:06+5:302023-07-15T10:31:30+5:30

वृद्ध महिलेला देवाने फोन केला आणि तिची सेविंग आपल्या स्वर्गातील चर्चमध्ये जमा करायला सांगितली. महिला देवाला या गोष्टीसाठी नाही म्हणू शकली नाही. 

hello i am god deposits money at bank of heaven scammer poses god loots crores from woman spain | "हॅलो मी देव आहे, स्वर्गाच्या बँकेत पैसे जमा करा..."; 6 वर्षात महिलेकडून लुटले 2.76 कोटी

"हॅलो मी देव आहे, स्वर्गाच्या बँकेत पैसे जमा करा..."; 6 वर्षात महिलेकडून लुटले 2.76 कोटी

googlenewsNext

कधी कधी श्रद्धेच्या नावाखाली लोकांची मोठा फसवणूक केली जाते. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे, एका महिलेला अशाच प्रकारे लुटण्यात आले. 2013 मध्ये स्पेनच्या वृद्ध महिलेला पहिल्यांदा एक कॉल आला होता. देवाच्या नावाने तिला फोन केला. स्पेनमधील लिओन येथील एस्पेरांझा या वृद्ध महिलेला देवाने फोन केला आणि तिची सेविंग आपल्या स्वर्गातील चर्चमध्ये जमा करायला सांगितली. महिला देवाला या गोष्टीसाठी नाही म्हणू शकली नाही. 

महिलेला एकदाही आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला नाही, कारण जेव्हा तिला फोन आला तेव्हा ती देवाने निवडलेली होती याची तिला खात्री होती. सहा वर्षांपर्यंत, एस्पेरांझाने देवाच्या सूचनांचे पालन केले आणि स्थानिक सुविधा स्टोअरमध्ये एका छोट्या ड्रॉवरमध्ये सुमारे 300,000 युरो म्हणजेच तब्बल 2.76 कोटी जमा केले. हे पैसे स्वर्गातील चर्चमध्ये जात असल्याचं तिला सांगण्यात आलं.

एका स्थानिक दुकानदाराने महिलेला लुटल्याचा आरोप आहे, ज्याला महिलेची धर्माबद्दलची आस्था माहीत होती आणि त्याला याचाच गैरफायदा घ्यायचा होता. तिला 2013 मध्ये पहिल्यांदा देवाचा फोन आला तेव्हा तिला आश्चर्य वाटलं नाही. कॉलरने तिला तिचे पैसे "स्वर्गातील बँकेतील देवाच्या चेकिंग खात्यात" जमा करण्यास सांगितले. तिला पृथ्वीवरील बँकांपेक्षा चांगले व्याज देण्याचे वचन दिले होते, तसेच बचत केलेल्या पैशातून स्वर्गात स्वतःचं घर बांधण्याबाबत देखील सांगितलं, 

2013 ते 2019 पर्यंत, वृद्ध महिलेने तिची सर्व बचत स्थानिक सुविधा स्टोअरमध्ये एका छोट्या ड्रॉवरमध्ये जमा केली, जिथून फसवणूक करणारा शांतपणे पैसे काढायचा. महिलेने आपली सर्व बचत देवाला प्रसन्न करण्यासाठी खर्च केली आणि बँकेचे कर्ज घेऊन दोनदा पैसेही दिले. देवासोबतच्या या तिच्या व्यवहाराबद्दल कोणालाच माहिती नव्हती, अगदी तिच्या मुलांनाही नाही, कारण तिने कोणाला सांगितल्यास तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. तिचं सेविंग अकाऊंट रिकामं असल्याचं लक्षात येताच मुलांना ही बाब समजली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: hello i am god deposits money at bank of heaven scammer poses god loots crores from woman spain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.