हॅलो, मी सचिवालयातून बोलतोय! फोन उचलताच नगरसेवकांच्या खात्यातून दीड लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 04:24 PM2020-05-04T16:24:59+5:302020-05-04T16:38:43+5:30
नगरसेवक आता पोलिसांत तक्रार करत आहेत.
कानपूर - सॅनिटायझर, मास्क आणि रेशनसाठी पैसे पाठविण्याच्या नावाखाली तीन नगरसेवकांच्या बँक खात्यातून १.१५ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन काढली गेली. अनेक नगरसेवक ओटीपी देण्यास नकार देऊन वाचले. ज्याने स्वत: ला सचिवालयातील कामगार म्हणून कॉल करून बतावणी केली आणि त्यास ओटीपी न दिल्याबद्दल धमकावले. नगरसेवक आता पोलिसांत तक्रार करत आहेत.
कल्याणपूरच्या नगरसेविका अंजू मिश्रा यांनी सांगितले की, ठगाने कॉल करून सचिवालयातून बोलत असल्याचे सांगितले आणि पंतप्रधानांच्यावतीने त्यांना सॅनिटायझर आणि मास्क वितरणासाठी पैसे पाठवित असल्याचे सांगितले आहे. दरम्यान ज्यावेळी हा फोन आला त्यावेळी नगरसेविकेचा पती कौशल मिश्रा यांच्याकडे होता. कॉलरने बँक खाते क्रमांक विचारला. यानंतर ओटीपी मोबाईलवर आला. कौशलच्या मते मुलाने ओटीपी देण्यास नकार दिला,मात्र सरकारी कामात नकार देत नाही असे समजावून सांगितले. ओटीपी देताच त्याच्या दोन बँक खात्यातून 60 हजार रुपये काढून घेण्यात आले.
असाच एक फोन आर्यन नगरचे नगरसेवक अवनीश खन्ना यांना आला. त्यांच्या मते, कॉलरने सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक - एक हजार रुपये लोकांना वाटण्यासाठी तुम्हाला पाठवित आहेत. अवनीशच्या म्हणण्यानुसार मुलगी ओटीपी देण्यास नकार दिला. परंतु त्यांनी ओटीपी दिला. यानंतर त्याच्या खात्यातून 9,999 रुपये काढून घेण्यात आले. असाच एक फोन परमपुरवाचे नगरसेवक राकेश पासवान यांचा मुलगा शुभमला आला. त्यांना अन्न वितरणासाठी पंतप्रधानांच्यावतीने पैसे पाठवत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून डेबिट कार्डची माहिती घेतल्यानंतर 24 मिनिटांत सात वेळा त्याच्या खात्यातून 44,396 रुपये काढले गेले. त्यांनी गोवारी नगर पोलिसांना तक्रार दिली आहे.
लॉकडाऊनमध्ये डीआरआयची कारवाई, ३५ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये इफ्तार पार्टी ठेवणं पडलं महागात, १९ जणांवर गुन्हा दाखल
अशोक नगर येथील नगरसेविका नमिता मिश्रा यांना शंका आल्यावर पती सतीशचंद्र मिश्रा यांना फोन केला. जेव्हा त्याने ओटीपी देण्यास नकार दिला, तेव्हा कॉलरने कारवाईची धमकी दिली. बर्राचे नगरसेवक आपत यादव यांनी बर्रा पोलिस ठाण्यात एक तक्रार दिली आणि सांगितले की, फोन करणारा स्वत: ला सचिवालयातील अनिल अग्रवाल असे संबोधत होता. नगरसेवकांच्या फसवणूकीबाबत एसएसपी अनंतदेव यांच्याशी बोललो असल्याचे भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष सुनील बजाज यांनी सांगितले. त्याने तपास अधिकारी लाल सिंह यांच्याकडे सोपविला आहे.