बोगस क्रेडिट कार्डच्या मदतीने मॅनेजरने घातला बँकेला कोट्यवधींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 10:04 PM2019-01-01T22:04:31+5:302019-01-01T22:07:29+5:30

फसवणूकीप्रकरणी मॅनेजरला अटक 

With the help of a bogus credit card, billions of millions of dollars to the bank | बोगस क्रेडिट कार्डच्या मदतीने मॅनेजरने घातला बँकेला कोट्यवधींचा गंडा

बोगस क्रेडिट कार्डच्या मदतीने मॅनेजरने घातला बँकेला कोट्यवधींचा गंडा

Next
ठळक मुद्दे प्रथमदर्शी ही फसवणूक 34 लाख रुपये असल्याचे पुढे आले होतेपोलीस तपासात मुजावर यांनी 2012 पासून बॅंकेला तब्बल 3 कोटी रुपयांना गंडवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मुजावरला अटक बोगस ग्राहक दाखवून बॅंकेकडून मिळणारा मोबदला स्वत: च्या खात्यावर जमा करून घेतले

मुंबई - बोगस क्रेडिटकार्डच्या मदतीने बॅंकेलाच कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला शिवडी पोलिसांनीअटक केली आहे. नदरूल मुजावर असे या आरोपी व्यवस्थापकाचे असून न्यायालयाने त्याला 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमदर्शी ही फसवणूक 34 लाख रुपये असल्याचे पुढे आले होते. मात्र, पोलीस तपासात मुजावर यांनी 2012 पासून बॅंकेला तब्बल 3 कोटी रुपयांना गंडवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मुजावरला अटक केली. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.   

राष्ट्रीयकृत बॅंकेच्या व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले मुजावर याची 2012 साली बॅंकेच्या क्रेडिट कार्ड रिकव्हरी विभागात बदली झाली होती. रिकव्हरी विभागाचे कार्यालय शिवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रे रोड परिसरात आहे. मागील सात वर्षापासून मुजावर हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांकडून पैसे जमा करून घेऊन तो अहवाल पुढे बॅंकेला पाठवत होते. दरम्यान या अहवालात मुजावर यांनी बोगस ग्राहक दाखवून बॅंकेकडून मिळणारा मोबदला स्वत: च्या खात्यावर जमा करून घेतले.  नोव्हेंबर 2018 मध्ये मुजावर यांची त्या विभागातून बदली झाली. 
त्या विभागात नव्याने आलेल्या चिफ रिकव्हरी विभागाच्या अधिकाऱ्याच्या मुजावरने केलेला फसवणुकीचा प्रकार उघड लक्षात आला. मुजावर यांनी बॅंकेची 34 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे दाखवून देत बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली. त्यानंतर मुजावर यांना बॅंकेने काढून टाकत या प्रकरणी बॅंकेने 20 डिसेंबर रोजी शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

Web Title: With the help of a bogus credit card, billions of millions of dollars to the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.